agriculture news in marathi, In Kolhapur, there is rain in the dam | Agrowon

कोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूच
टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

कोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (ता. १४) दुपारपर्यंत सुरू होती. राधानगरी धरणांतून विसर्ग सुरूच होता. राधानगरीतून २८५६ व वीजनिर्मितीसाठी १६०० असा ४४५६ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग भोगावतीत सुरू असल्याने नदीची पातळी वाढली आहे. काळम्मावाडी धरणाच्या वक्राकार दरवाजातून ५००० क्‍युसेक पाणी दूधगंगा नदीत सोडण्यात येत आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर आजही कायम होता. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे.

कोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (ता. १४) दुपारपर्यंत सुरू होती. राधानगरी धरणांतून विसर्ग सुरूच होता. राधानगरीतून २८५६ व वीजनिर्मितीसाठी १६०० असा ४४५६ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग भोगावतीत सुरू असल्याने नदीची पातळी वाढली आहे. काळम्मावाडी धरणाच्या वक्राकार दरवाजातून ५००० क्‍युसेक पाणी दूधगंगा नदीत सोडण्यात येत आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर आजही कायम होता. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे.

तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्याने धरणाचे तिन्ही दरवाजे उघडण्यात आले आहेत. ७५० क्‍युसेकने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या वर्षी धरणाचे दुसऱ्यांदा दरवाजे उघडण्यात आले आहे. पाणलोट क्षेत्रात ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. केळोशीच्या उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने धरणाचे तीनही दरवाजे उघडण्यात आले आहेत. वारणा धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे.

धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. शाहूवाडी तालुक्‍यात संततधार पाऊस सुरू आहे. शत्तूर-आरळा, सोंडोली-चरण, भेडसगाव-बिळाशी या पुलावर पाणी येण्याचा धोका आहे; तर कोकरूड-रेठरे दरम्यानचा पूल पाण्याखाली गेला आहे. मालेवाडी, रेठरे परिसरातील वाहतूक तुरुकवाडीमार्गे सुरू आहे. कानसा व वारणा नद्यांनी धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. कोकरूड, रेठरे, गोंडोली, मालेवाडी, विरळे, जांबूर, कांडवण, पळसवडे, सोंडोली, खेडे, शिरार्ळे, भेडसगाव परिसरातील नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान संततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले.

 

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई होतेय तीव्रसातारा ः जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई तीव्र होत...
पुणे जिल्ह्यासाठी २६ हजार ५७३ क्विंटल...पुणे  ः खरीप हंगाम सुरू होण्यास एक ते दीड...
तंटामुक्‍त गाव अभियानाला चंद्रपुरात...चंद्रपूर : शांततेतून समृद्धीकडे जाण्याचा...
अमरावतीत तुर चुकाऱ्यासाठी हवे ८७ कोटी;... अमरावती : चुकाऱ्यांसाठी यंदा शेतकऱ्यांना...
शेतीच्या दृष्टीने सरकारचा कारभार...नाशिक : अगोदरचा कालखंड व ही पाच वर्षे यात...
अमरावतीतून ९१ विहिरी अधिग्रहणाचे...अमरावती  ः सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे...
शिल्लक एफआरपी मिळत नसल्याने साताऱ्यातील...सातारा  : अजिंक्यतारा कारखान्याचा अपवाद...
कांदा दर वाढले, तेव्हा भाजपने विरोध...नाशिक   ः कृषिमंत्री असताना मी...
'मतदान झालेल्या दुष्काळी भागात ...मुंबई  ः लोकसभेच्या मतदानाच्या तीन...
उच्चांकी मतदानामुळे कोल्हापूर मतदारसंघ...कोल्हापूर  : राज्याच्या तुलनेत कोल्हापूर...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...