कोल्हापुरात टोमॅटो प्रतिदहा किलो ४० ते १५० रुपये

कोल्हापुरात टोमॅटो प्रतिदहा किलो ४० ते १५० रुपये
कोल्हापुरात टोमॅटो प्रतिदहा किलो ४० ते १५० रुपये

कोल्हापूर : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. २१) टोमॅटोची सर्वाधिक १५०० कॅरेटची आवक झाली. टोमॅटोस दहा किलोस ४० ते १५० रुपये दर मिळाला. वांग्याच्या आवकेतही वाढ होती. वांग्याची नऊशे पंचवीस करंड्या आवक झाली. वांग्यास दहा किलोस ५० ते ४०० रुपये दर मिळाला. ढोबळी मिरचीस दहा किलोस ५० ते २१० रुपये दर मिळाला.

श्रावणाच्या पार्श्‍वभूमीवर बहुतांशी भाजीपाल्याची आवक वाढलेली असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. ओली मिरचीची तीनशे ते चारशे पोती आवक होती. ओल्या मिरचीस दहा किलोस १५० ते ३५० रुपये दर होता. गवारीची शंभर पोती आवक झाली. गवारीस दहा किलोस १०० ते ४१० रुपये दर मिळाला. ओला वटाण्याची २५६ पोती आवक होती. ओला वटाण्यास दहा किलोस ५० ते ४७० रुपये दर होता. गाजराची १६ पोती आवक होती. गाजरास दहा किलोस १५० ते ३०० रुपये दर होता.

कोथिंबिरीची वीस हजार पेंढ्या आवक होती. कोथिंबिरीस शेकडा २०० ते ६०० रुपये दर मिळाला. मका कणसाची दीडशे ते दोनशे नगांची आवक होती. मका कणसास शेकडा ३०० ते ५०० रुपये दर मिळाला. भेंडीची दोनशे ते तीनशे पोती आवक होती. भेंडीस दहा किलोस ५० ते ३०० रुपये दर होता. पालेभाज्यांमध्ये कांदा, पात, मेथी पालक आदि भाज्यांची  ४०० ते ६०० पेंढ्या आवक झाली. डाळिंबाची ७० करंड्यांची आवक होती. डाळिंबास किलोस १० ते ५० रुपये दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com