agriculture news in marathi, Konkan to have heavy rain today | Agrowon

कोकणात आज मुसळधार; मॉन्सूनची वाटचाल जैसे थे 
टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 जून 2018

पुणे : राज्यात मॉन्सूनपूर्व पावसाने दणक्यात हजेरी लावली आहे. उद्यापासून (ता. ६) कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात शुक्रवारपासून (ता.८) पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

पुणे : राज्यात मॉन्सूनपूर्व पावसाने दणक्यात हजेरी लावली आहे. उद्यापासून (ता. ६) कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात शुक्रवारपासून (ता.८) पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशादरम्यान १३ अंश उत्तर अक्षांशादरम्यान समुद्रसपाटीपासून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर असलेले वाऱ्यांचे पूर्व-पश्‍चिम जोडक्षेत्र यामुळे किनारपट्टीलगत आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये ढग गाेळा होत आहेत.  

बंगालच्या उपसागरातही ढगांची गर्दी झाली असून, उपसागराच्या उत्तर भागात शुक्रवारी (ता. ८) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. मॉन्सूनच्या आगमनास पोषक हवामान हाेत असल्याने उद्यापासून (ता.६) कोकणाच्या दक्षिण भागात पाऊस जोर धरणार आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात अाली आहे. राज्यात पूर्वमाेसमी पाऊस पडत असून, अनेक ठिकाणी ३० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाने हजेरी लावली आहे.

मंगळवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) : 

  • कोकण : ठाणे - कुंभर्ली ४२, रायगड - उरण ४३, माणगाव ६०, वाकण ५२. रत्नागिरी - पावस ६०, कोटवडे ४९, देवली ५०, सिंधुदुर्ग - शिरगाव ४७, कुडाळ ५०, कडवल ४८, तालवट ४८. 
  • मध्य महाराष्ट्र : पुणे - वडगाव मावळ ३१, राजगुरूनगर ३५, वाडा ४०, पाईट ३०, कडूस ५०, सोलापूर - करमाळा ३१. कोल्हापूर - कोतोली ३४, शिरोली-दुमाला ३९, इस्पुर्ली ६६, कणेरी ३०. 
  • मराठवाडा : बीड - अंबाजोगाई ५१, लोखंडी ७२, परळी ४९, मोहखेड ५८, वाडवणी ५७, लातूर - निलंगा ५९, पानगाव ३०, देवणी ७६, वलांडी ४२, साकोळ ५८.३, उस्मानाबाद - इतकूर ३८.३, मोहा ३१. नांदेड - मांडवी ५४, जवळगाव ३२.५, परभणी - चारठाणा ४८, हिंगोली - आखाडा बाळापूर ३१. 
  • विदर्भ : यवतमाळ - येळबारा ३४, घाटंजी ४७, शिरोली ३६, पारवा ५१, नागपूर - कामठी ३१, भंडारा - विरली ७१, लाखंदूर ५८, बारव्हा ३९, पोहारा ५२, लाखनी ६८, चंद्रपूर - मूल ४३, बह्मपूरी ४७, चौगण ६१, गडचिरोली - धानोरा ५४.

मॉन्सूनची वाटचाल जैसे थे 
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. ४) संपूर्ण तामिळनाडू, कर्नाटकचा आणखी काही भाग, तसेच आंध्र प्रदेशचा दक्षिण भागापर्यंत मजल मारली आहे. मंगळवारी मात्र मॉन्सूनने आणखी वाटचाल केली नाही. दक्षिण अंतर्गत कर्नाटकातील शिरळी, चित्रदुर्ग आणि अांध्र प्रदेशच्या दक्षिण भागातील आराेग्यवरम, श्रीहरीकोटापर्यंतची माॅन्सूनची सीमा कायम होती. गुरुवारपर्यंत (ता.७) सकाळपर्यंतच्या ४८ तासांमध्ये मॉन्सून तळ कोकणात धडक देण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागात माॅन्सून दाखल होण्यास पोषक हवमान असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
बा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे!‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली,  पूर...
विना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
दुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...
प्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...
दूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...
पीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...
पाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...
अन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...
साखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई  ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....
राज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...