agriculture news in marathi, Konkan may have rainfall on Saturday says IMD | Agrowon

कोकणात शनिवारपासून पाऊस?
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 मे 2018

पुणे : अरबी समुद्रात अालेले ‘मेकुणू’ चक्रीवादळ ओमानकडे गेल्यानंतर शनिवारी (ता. २६) केरळसह पश्‍चिम किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता आहे. शनिवारपासून कोकणातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्याच्या तापमानात चढ-उतार होत असून, मध्य महाराष्ट्रात तापमान घटले आहे. विदर्भ, मराठवाड्यातही तापमानात घट झाली असली तरी उन्हाचा चटका कायम आहे. बुधवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील चंद्रपूर येथे उच्चांकी ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पुणे : अरबी समुद्रात अालेले ‘मेकुणू’ चक्रीवादळ ओमानकडे गेल्यानंतर शनिवारी (ता. २६) केरळसह पश्‍चिम किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता आहे. शनिवारपासून कोकणातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्याच्या तापमानात चढ-उतार होत असून, मध्य महाराष्ट्रात तापमान घटले आहे. विदर्भ, मराठवाड्यातही तापमानात घट झाली असली तरी उन्हाचा चटका कायम आहे. बुधवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील चंद्रपूर येथे उच्चांकी ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

मध्य महाराष्ट्रात वाहत असलेल्या वाऱ्यांमुळे तापमानात घट झाली आहे. जळगाव, मालेगाव वगळता सर्वच ठिकाणी तापमान ४० अंशांच्या खाली उतरले आहे. कोकणातही तापमान ३५ ते ३६ अंशांच्या दरम्यान आहे. तर विदर्भ, मराठवाड्यात सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा चाळीशी पार असल्याने उन्हाचा चटका कायम आहे. तर चंद्रपूर, अकोला येथे तापमान ४५ अंशांच्या पुढे असल्याने उष्णतेची लाट आहे. गुरुवारपासून ही लाट ओसरण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. मध्य प्रदेशपासून कर्नाटकपर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा, उत्तर मध्य महाराष्ट्रातील चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीत मिसळून गेला आहे. बुधवारी दुपारनंतर मराठवाडा, विदर्भात ढग गोळा झाले होते. मराठवाड्यातील लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, तर विदर्भातील यवतमाळ, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती जिल्ह्यांत ढगाळ वातावरण होते.

बुधवारी (ता. २३) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.३, नगर ३८.४, जळगाव ४३.०, कोल्हापूर ३४.०, महाबळेश्वर ३०.६, मालेगाव ४३.२, नाशिक ३६.३, सांगली ३५.४, सातारा ३८.६, सोलापूर ३९.०, मुंबई ३५.१,अलिबाग ३६.६, रत्नागिरी ३३.९, डहाणू ३६.८, आैरंगाबाद ४०.३, परभणी ४०.९, अकोला ४५.२, अमरावती ४३.८, बुलडाणा ४१.०, ब्रह्मपुरी ४४.७, चंद्रपूर ४५.५, गोंदिया ४२.४, नागपूर ४३.७, वर्धा ४३.६, यवतमाळ ४४.०. 

इतर अॅग्रो विशेष
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
परभणी ठरले देशात उष्णपुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक थांबणार कधी?नाशिक: नाशिक जिल्ह्यातील मुख्य अर्थकारण...
यवतमाळच्या अनिकेतने तयार केला फवारणीचा...यवतमाळ ः फवारणीमुळे होणाऱ्या विषबाधा सर्वदूर...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर...पणजी : गेल्या एक वर्षापासून अधिक काळ...