agriculture news in marathi, Konkan to receive showers today | Agrowon

कोकणात पावसाच्या सरी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 जून 2018

पुणे : कोकण किनारपट्टीवर पावसाच्या सरी बरसण्यास सुरवात झाली आहे. तर घाटमाथा, मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. उद्यापासून (मंगळवार) कोकणात बहुतांशी ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून, बुधवारपासून (ता. २०) या भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. दरम्यान नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून) वाटचालीस पोषक स्थिती नसल्याने आणखी काही दिवस माॅन्सूनची वाटचाल जैसे थे राहणार असल्याचे हवामान विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. 

पुणे : कोकण किनारपट्टीवर पावसाच्या सरी बरसण्यास सुरवात झाली आहे. तर घाटमाथा, मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. उद्यापासून (मंगळवार) कोकणात बहुतांशी ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून, बुधवारपासून (ता. २०) या भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. दरम्यान नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून) वाटचालीस पोषक स्थिती नसल्याने आणखी काही दिवस माॅन्सूनची वाटचाल जैसे थे राहणार असल्याचे हवामान विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. 

मॉन्सूनचे प्रवाह मंदावल्यानंतर राज्यात हळूहळू पावसाला सुरवात झाली अाहे. रविवारी (ता. १७) सकाळपासून कोकण किनारपट्टी ढगांची दाटी झाली, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलके ढग जमा झाले होते. सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पडल्या.  

वसई, भिवंडी, देवगड, मालवण, सांताक्रूझ, गुहागर, तलासरी, ठाणे, डहाणू येथे जोरदार पावसाने हजेरी लावली. घाटमाथ्यासह, सह्याद्रीच्या पूर्व उतारवरील जावळी मेढा, पाटण, लाेणावळा, इगतपुरी आदी भागांत पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. मराठवाडा आणि विदर्भात मात्र मुख्यत: कोरडे हवामान होते. आज (ता. १८) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता अाहे.    

रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील चंद्रपूर येथे उच्चांकी ४०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३०.७, जळगाव ४०.०, कोल्हापूर ३१.५, महाबळेश्वर २०.३, मालेगाव ३९.०, नाशिक ३१.१, सातारा ३१.१, सोलापूर ३५.६, मुंबई ३२.१, अलिबाग ३०.२, रत्नागिरी ३१.७, डहाणू ३३.१, आैरंगाबाद ३४.६, परभणी ३७.७, नांदेड ३५.०, अकोला ३९.२, अमरावती ३८.६, बुलडाणा ३६.८, ब्रह्मपुरी ३९.८, चंद्रपूर ४०.४, गोंदिया ३९.६, नागपूर ३९.८, वर्धा ४०.०, यवतमाळ ३७.५. 

रविवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये, स्रोत - हवामान विभाग) : 

  • कोकण : वसई ८०, भिवंडी, दवगड प्रत्येकी ७०, मालवण, सांताक्रूझ प्रत्येकी ६०, गुहागर, तलासरी, ठाणे, डहाणू प्रत्येकी ५०, उरण, कुडाळ प्रत्येकी ४०, रत्नागिरी, हर्णे, संगमेश्‍वर, सावंतवाडी, वैभववाडी, तळा, म्हसळा, पेण, श्रीवर्धन, कल्याण, चिपळूण, मोखेडा प्रत्येकी ३०.
  • मध्य महाराष्ट्र : जावळी मेढा ४०, पाटण ३०, लोणावळा, इगतपुरी, महाबळेश्‍वर, राधानगरी प्रत्येकी २०. गगनबावडा, कराड, पेठ, अाजरा प्रत्येकी १०.   
  • घाटमाथा : ताम्हिणी ४०, शिरगाव, वळवण, दावडी, डुंगरवाडी, कोयना नवजा प्रत्येकी २०. 
  • मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव : विहार ८०, तानसा ५०, तुलसी, मध्य वैतरणा प्रत्येकी २०. 

इतर ताज्या घडामोडी
अब आया उंट पहाड के निछे; राजू शेट्टींचा...सोलापूर : शेतकऱ्यांच्या दूध दराच्या प्रश्‍...
सरकार रिलायन्स, पतंजलीच्या दुधाची वाट...नागपूर : एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस-...नागपूर : कधी देणार कधी देणार...कापूस, धानाला...
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...