agriculture news in marathi, Konkan seashore receives heavy rainfall | Agrowon

कोकण किनारपट्टीवर धुमशान...!!!
टीम अॅग्रोवन
रविवार, 10 जून 2018

पुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, ठाण्यात मॉन्सूनने दमदार आगमन केले आहे. शनिवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत अनेक ठिकाणी धुंवाधार पावसामुळे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सिंधुदुर्गमधील मालवण येथे उच्चांकी ४९१ मिलिमीटर, वेंगुर्ला येथे २६६ मिलिमीटर तर ठाण्यातील भिवंडी येथे २१० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. तर उर्वरित राज्यातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.

पुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, ठाण्यात मॉन्सूनने दमदार आगमन केले आहे. शनिवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत अनेक ठिकाणी धुंवाधार पावसामुळे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सिंधुदुर्गमधील मालवण येथे उच्चांकी ४९१ मिलिमीटर, वेंगुर्ला येथे २६६ मिलिमीटर तर ठाण्यातील भिवंडी येथे २१० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. तर उर्वरित राज्यातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.

कोकण किनारपट्टीवर शुक्रवारपासून पाऊस सुरू झाला असून, शनिवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला होता. समुद्रही खवळला असून किनारपट्टीत दिवसभर पावसाच्या सरी बरसत होत्या. सह्याद्री पट्ट्यात पावसाचा जोर कमी असला तरी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. नदीनाल्यांमधून पाणी वाहू लागले असून, गोड्या पाण्यातील चढणीचे मासे मारण्यासाठी खवय्यांची लगबग सुरू झाली आहे. मुंबईसह उत्तर कोकणात ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्याच्या विविध भागांत रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला.

मुसळधार सरी कोसळत असतानाचा मालवन, कणकवलीतील व्हिडिअो..

पुणे जिल्ह्यातील हवेली, पुरंदर, इंदापूर, आंबेगाव तालुक्यांत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. जोरदार पावसामुळे शेतांना तळ्याचे स्वरूप आले, तर सखल भागात पाणी साचण्याबरोबरच ओढे, नाले वाहू लागले. सातारा जिल्ह्यात सर्वच तालुक्‍यांत शुक्रवारी दमदार पावसाने हजेरी लावली आहे. कोरेगाव, माण, खटाव या दुष्काळी तालुक्‍यांतही अनेक भागामध्ये दमदार पाऊस झाल्याने जलसंधारण झालेल्या कामात पाणी साचले होते. सोलापूर जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. शेतशिवारात सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. सांगली जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर कमी कमी झाला होता. नगर जिल्ह्यातील शिर्डी विमानतळ परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने विमानतळाचे नुकसान झाले. संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, नगर, कर्जत तालुक्‍यामध्ये चांगल्या पाऊस नोंद झाली. पावसाने नदी, नाले, ओढे व शेतात चांगले पाणी वाहू लागले. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली व उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.

शनिवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्राेत हवामान विभाग) :

  • कोकण : मालवण ४९१, वेंगुर्ला २६६, भिवंडी २१०, मुरूड १३४, पनवेल १३१.६, रत्नागिरी १०२.४, हर्णे १०४, गुहागर ११०, सावंतवाडी १३१, कुडाळ १७५, देवगड १९०, पवई ११९, नेरूळ १२६, खेड १०५, श्रीवर्धन, म्हसळा प्रत्येकी ९५, ठाणे ८४, अलिबाग ५०, कुलाबा ४०.
  • मध्य महाराष्ट्र : नगर ३०. पुणे, सातारा १०.
  • मराठवाडा : परभणी ३०, नांदेड १०.
  • विदर्भ : मंगरुळपीर ११०, कारंजा, वाशीम प्रत्येकी ९०, मालेगाव, नारखेडा प्रत्येकी ७०, आर्वी, दारव्हा, डिग्रज, मूर्तिजापूर, रिसोड प्रत्येकी ५०, अार्नी, बट्टकोली, चांदूर, धामणगाव, खारंगा, मनोरा, नांदगाव काझी, परतवाडा प्रत्येकी ३०, अकोला, बाभुळगाव, बाळापूर, चांदूरबाजार, चिखलदरा, दिनापूर, देवळी, कामठी, महागाव, मौदा सावनेर, तिवड प्रत्येकी २०.
  • घाटमाथा : लोणावळा ६०, भिरा ५०, वळवण, ताम्हिणी, धारावी प्रत्येकी ४०, डुंगरवाडी, कोयना पोफळी प्रत्येकी ३०, भिवापूर, खंद प्रत्येकी २०.
  • मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव : विहार १५०, तुलसी ७०, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा प्रत्येकी २०.

कोकणात जोरदार पावसाचा अंदाज
कोकणात पावसाने जोर धरला असून, मंगळवारपर्यंत (ता. १२) दक्षिण कोकणात जोरदार ते अति जोरदार, उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. सोमवारपर्यंत (ता. ११) मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

इतर अॅग्रो विशेष
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...
लांबलेला पाऊस आणि नियोजनशून्य कारभारजूनचा पहिला पंधरवाडा उलटून गेला तरी राज्यात...
पर्यावरणकेंद्री विकास ही जगाची गरच आजमितीला भारत व जगाला भेडसावणारी अव्वल समस्या आहे...
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा...वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...