agriculture news in marathi, Konkan waiting for Monsoon showers | Agrowon

कोकणला मॉन्सूची प्रतिक्षा, समुद्राचे पाणी गढूळ !
तुषार सावंत
गुरुवार, 7 जून 2018

कणकवली, जि. सिंधुदुर्ग : मृग नक्षत्राच्या पुर्वसंधेला कोकणात मॉन्सूच्या आगमनाची प्रतिक्षा आहे. समुद्राचे पाणी गढूळ असले तरी सागरी लाटांचा मारा अद्याप सुरू झालेला नाही. पण नैसर्गिक हालचालींचा वेग मात्र वाढला आहे. गेले आठ दिवस पावसाने अधूनमधुन पावने हजेरी लावल्याने खंरीप हंगामातील पेरणीच्या कामाला सुरूवात झाली आहे.

कणकवली, जि. सिंधुदुर्ग : मृग नक्षत्राच्या पुर्वसंधेला कोकणात मॉन्सूच्या आगमनाची प्रतिक्षा आहे. समुद्राचे पाणी गढूळ असले तरी सागरी लाटांचा मारा अद्याप सुरू झालेला नाही. पण नैसर्गिक हालचालींचा वेग मात्र वाढला आहे. गेले आठ दिवस पावसाने अधूनमधुन पावने हजेरी लावल्याने खंरीप हंगामातील पेरणीच्या कामाला सुरूवात झाली आहे.

जिल्ह्यात आतापर्यत एकूण 874.6 मिमी. मिळून सरासरी 109.32 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदा पावसाचे आगमन तसे शांततेत झाले. मात्र मॉन्सून सध्यातरी सक्रीय झालेला नाही. आज मृगनक्षत्र असल्याने सायंकाळी उशीरापर्यत पावसाचे मॉन्सूनचे आगमन होईल असा अंदाज मांडला जात आहे. पण अरबीसमुद्राच्या हालचालीत मोठा बदल झाला नव्हता. दुपारी समुद्राला भरती येणार आहे. त्यामुळे सायंकाळी किंवा रात्री उशीराने मॉन्सूनचे जोरदार आगमन होईल असे भाकीत शेतकरी आणि खलाशी व्यक्त करीत आहेत.

गेल्या आठ दिवसात दमदार पाऊस झाल्याने भात पेरणीला सुरूवात झाली आहे. तर सह्याद्रीच्या कुशीतील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत प्रवाहीत होऊ लागले आहे. पावसामुळे बाजारपेठात शेती आणि औजारे खरेदीसाठी लगबग वाढू लागली आहे.

जिल्हा प्रशासनाकडून अतिदक्षतेचा इशारा
सिंधुदुर्गात 7 ते 11 जून या कालावधीत अतिवृष्टी होणार असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असा अतिदक्षतेचा इशारा निवाशी जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापनचे मुख्यकार्यकारि अधिकारी विजय जोशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकातून दिला आहे. वीजाच्या कडकडासह मुसळधार पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली असून समुद्राच्या लाटापासून दुर राहण्याचा सावधतेचा इशाराही देण्यात आला आहे.
 

इतर अॅग्रो विशेष
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...
'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...
दहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...
शेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...
कसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष? अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...
'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर  : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...
पंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...
विविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
किमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...