कोपर्डी प्रकरणातील तिनही आरोपी दोषी 

कोपर्डी प्रकरणातील तिनही आरोपी दोषी
कोपर्डी प्रकरणातील तिनही आरोपी दोषी

नगर : कोपर्डी येथील शाळकरी मुलीवर अत्याचार व तिचा खून केल्याच्या आरोपावरुन विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने तिनही आरोपींना आज दोषी ठरविले. जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे (वय 25, रा. कोपर्डी, ता कर्जत), संतोष गोरख भवाळ (वय 30, मूळ रा. खांडवी, हल्ली रा. कोपर्डी), नितीन गोपीनाथ भैलुमे (वय 26, रा. कोपर्डी) असे आरोपी नावे आहेत. निकालाची अपेक्षा असल्याने आज न्यायालयात गर्दी झाली होती. येत्या 21 नोव्हेंबरला त्यावर सरकारी पक्षाचे व आरोपींच्या वकीलांना बाजू मांडण्याची संधी देण्यासाठी सुनावणी ठेवण्यात आली आहे. त्यानंतर निकाल घोषित होण्याची शक्‍यता आहे. अधिक माहिती अशी, कोपर्डी येथील तुकाई. लवण वस्ती परिसरात 13 जुलै 2016 रोजी सायंकाळी सात वाजता नववीत शिकाणारी शाळकरी पीडित मुलगी आजोबांच्या घरी मसाला आणण्यासाठी गेली होती. मसाला घेऊन ती पुन्हा घराकडे निघाली असता जितेंद्र शिंदे याने तिला रस्त्यात अडविले. त्यानंतर रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला व त्यानंतर तिची निर्घृण हत्या केली. प्रतिकारात पीडितेचे दोन्ही होत मोडलेले होते.  पीडितेच्या चुलत्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी आरोपी जितेंद्र शिंदे याला श्रीगोंदे येथून ताब्यात घेतले. त्यानंतर चार दिवसांनी संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने तिन्ही आरोपींविरुद्ध कट रचून अत्याचार व खून केल्याचा आरोप ठेवला. या खटल्यात 31 साक्षीदार तपासण्यात आले. त्यात वैद्यकीय अधिकारी, पीडितेच्या मैत्रिणी, चुलत आजोबा यांच्या साक्षी महत्त्वाच्या.  ठरल्या. सरकारपक्षाने 24 परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी न्यायालयात मांडली आणि ती सिद्ध केली. सरकार पक्षाचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी आरोपीला दोषी ठरविले. सरकार पक्षातर्फे राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली. आरोपीतर्फे विधी सेवा प्राधिकरणचे ऍड. योहान मकासरे, ऍड. बाळासाहेब खोपडे, विजयालक्ष्मी खोपडे, ऍड. प्रकाश आहेर यांनी बाजू मांडली. 21 तारखेला आरोपी 3 तर्फे तर आरोपी 1 व 2 तसेच सरकार पक्षातर्फे शिक्षेवर युक्तिवाद. त्यानंतर त्याच दिवशी किंवा त्यानंतरच्या तारखेला शिक्षा सुनावली जाणार असल्याचे स्पष्टीकरण विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले. तीनही आरोपीला खून, अत्याचार, खूनाचा व अत्याचाराचा कट, प्रोत्साहन देणे, छेडछाड, बालकांच्या अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) अशा सहा कलमाखाली तीनही आरोपीला दोषींवर धरले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com