agriculture news in marathi, Kopardi rape and murder case | Agrowon

कोपर्डी प्रकरणी आज निकाल
सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 नोव्हेंबर 2017

नगर : कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून केलेल्या खटल्याचा निकाल आज (बुधवारी) जाहीर होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा न्यायालय व परिसरात सुमारे दोनशे पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. साध्या वेशातील पोलिसही परिस्थितीवर लक्ष ठेवतील. कोपर्डी (ता. कर्जत) येथेही चाळीस पोलिसांसह राज्य राखीव व शीघ्र कृती दलाचे पथक तळ ठोकून असेल. नगर शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी शहरातील सगळ्याच भागांत पोलिसांचा पहारा राहणार आहे.

नगर : कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून केलेल्या खटल्याचा निकाल आज (बुधवारी) जाहीर होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा न्यायालय व परिसरात सुमारे दोनशे पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. साध्या वेशातील पोलिसही परिस्थितीवर लक्ष ठेवतील. कोपर्डी (ता. कर्जत) येथेही चाळीस पोलिसांसह राज्य राखीव व शीघ्र कृती दलाचे पथक तळ ठोकून असेल. नगर शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी शहरातील सगळ्याच भागांत पोलिसांचा पहारा राहणार आहे.

राज्यभर गाजलेल्या कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून झालेल्या खटल्यातील आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांनाही विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी दोषी ठरवले आहे. खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तिघांही फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे, तर आरोपीचे वकील ऍड. योहान मकासरे, ऍड. बाळासाहेब खोपडे व ऍड. प्रकाश आहेर यांनी कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी केलेली आहे. बुधवारी या खटल्यातील आरोपीला शिक्षा सुनावली जाणार आहे. आरोपीला काय शिक्षा सुनावली जाणार याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागलेले आहे.

शिक्षा दिली जाणार असल्याच्या या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी न्यायालय, नगर शहर व कोपर्डीतही मोठा बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन केले आहे. न्यायालयाच्या आवारात पोलिस उपअधीक्षकावर बंदोबस्ताची जबाबदारी असेल. न्यायालयाच्या परिसरात चार सहायक पोलिस निरीक्षक, 75 पोलिस कर्मचारी, दहा महिला पोलिस कर्मचारी, प्रत्येकी वीस पोलिस असलेले शीघ्र कृती दलाची दोन पथके व दंगल नियंत्रक पथक, राज्य राखीव दलाचे पथक तैनात असेल. निकालानंतर शहरात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सहायक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जागोजागी "फिक्‍स पॉइंट' लावले आहेत.

निकालानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून असतील. शहरात एक शीघ्र कृती दलाचे पथक फिरते असेल. न्यायालयाच्या परिसरात वकील, न्यायाधीश, पोलिस आणि नागरिकांच्या वाहनांसाठी न्यायालयासमोर स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था केली आहे. त्यासाठी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. न्यायालयात येणाऱ्या नागरिकांना सूचना देण्यासाठी ध्वनिवर्धकाची व्यवस्था केली जाणार आहे. नियंत्रण कक्षातही वीस कर्मचारी राखीव असतील. न्यायालय परिसरात निकाल ऐकण्यासाठी मोठी गर्दी होणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर परिसराची बॉंबशोधक पथकाकडून तपासणी केली जाणार आहे.

कडेकोट बंदोबस्त
कोपर्डी खटल्यातील आरोपीला शिक्षा सुनावली जाणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर शहर, न्यायालय परिसरात कडक बंदोबस्त असेलच; पण ज्या गावात घटना घडली त्या कोपर्डीतही पोलिस उपअधीक्षक, चार पोलिस निरीक्षकांसह 35 पोलिस कर्मचारी तळ ठोकून असतील. याशिवाय शीघ्र कृती दलाची दोन पथके आणि राज्य राखीव दलाचे एक पथक बंदोबस्तासाठी असेल.

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...