कोयना धरणाचे सहाही दरवाजे १ फुटाने उघडले

कोयना धरण संग्रहित छायाचित्र
कोयना धरण संग्रहित छायाचित्र

कऱ्हाड, जि. सातारा : पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाचे सहाही वक्र दरवाजे आज  (ता. २०) सकाळी ९.१५च्या सुमारास एक फुटाने उघडले. त्यातून ९ हजार २८७ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीत सुरू आहे. पायथा विज गृह सुरू होणार असून, त्यातूनही कोयना नदीत पाण्याचा विसर्ग सुरू होईल. चोवीस तासात कोयना धरणाच्या पाणी साठ्यात २.१७ टिएमसीने वाढ झाली आहे. आत्ता कोयना धरणात १०४.१७ टिएमसी पाणी साठा आहे. कोयना जलाशयाची सप्टेंबर मधील निर्धारीत जलपातळी १०३ टिएमसी आहे. ती गाठल्याने आज सकाळी धरणाचे सहाही वक्र दरवाजे उघडण्यात आले.

तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोयना धरणाची पाणीपातळी २१६२ फुट आहे. जलाशयाचा एकुण पाणीसाठा १०४ टीएमसी झाला आहे. चोवीस तासात कोयनानगरला १५१  (४३८८), नवजाला २२३ (५१य२६२) व महाबळेश्र्वरला १९३ (४४६९) मिलीमीटर पावसाची नोंद झाली. धरणात प्रतिसेकंद ११ हजार ७७० क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.

कोयना धरण व्यवस्थापनेने आज सकाळी कोयना धरणाचे दरवाजे उघडले. त्यामुळे चोवीस तासात ते पाणी सांगली जिल्ह्याच्या भागात पोचेल. त्यामुळे सातारा व सांगली जिल्ह्यातील नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com