agriculture news in Marathi, kranti sugar mill purchase humani, Maharashtra | Agrowon

क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी करणार 
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 मार्च 2019

कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण अभियानांतर्गत क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यामार्फत शेतकऱ्यांनी गोळा केलेले हुमणीचे भुंगेरे तीनशे रुपये किलो या दराने खरेदी करणार असलेची माहिती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी पत्रकाद्वारे दिली. 

कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण अभियानांतर्गत क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यामार्फत शेतकऱ्यांनी गोळा केलेले हुमणीचे भुंगेरे तीनशे रुपये किलो या दराने खरेदी करणार असलेची माहिती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी पत्रकाद्वारे दिली. 

या योजनेविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले, ‘‘कारखाना कार्यक्षेत्रात ७१ गावे आहेत. या सर्वच गावामध्ये ऊस, सोयाबीन, भुईमूग या पिकाला हुमणीचा प्रादुर्भाव सन २०१२ मध्ये सर्व प्रथम दिसून आला. हुमणी नियंत्रणासाठी कारखान्यामार्फत मागील वर्षापासून अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तथापि, सामुदायिक प्रयत्न न केल्यामुळे हुमणीचा संपूर्ण बंदोबस्त होऊ शकलेला नाही. हुमणीमुळे कार्यक्षेत्रात दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे उसाचे उत्पन्न व लाखो रुपये औषधावर खर्च होत आहे.’’

‘हुमणीच्या सर्व अवस्था जमिनीत राहतात त्यामुळे प्रादुर्भाव झाल्यानंतर उपाय योजना केल्यामुळे नियंत्रण करणे कठीण जाते. उन्हाळ्यातील वळीवाचा पाऊस झाल्यानंतर हुमणीचे भुंगेरे जमिनीतून बाहेर येतात व शेतातील लिंब, बाभूळ बोर या झाडांवर सायंकाळी जमा होतात. हे भुंगेरे गोळा करण्याच्या कामात शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा व अळी निर्माण होण्यापूर्वीच हुमणी नष्ट व्हावी, या हेतूने कारखान्याने शेतकऱ्यांनी गोळा केलेले भुंगेरे योग्य दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे भुंगेरे १५ मार्च ते १५ जून या कालावधीत आठवड्यातून प्रत्येक मंगळवार व शुक्रवारी कार्यालयीन वेळेत ऊसविकास विभागाकडे जमा करून, जाग्यावर वजनाप्रमाणे रोखीने रक्कम दिली जाईल असे सांगून, कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी या कामामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे,’ असे आवाहन त्यांनी केले. 

या वेळी क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, उपाध्यक्ष आत्माराम हारूगडे, कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक सी. एस. गव्हाणे, सचिव वसंत, लाड व कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.

इतर अॅग्रो विशेष
कडवंची : अर्थकारणाला मिळाली बचत गटांची...शेती आणि ग्रामविकासामध्ये महिलांचा महत्त्वपूर्ण...
कडवंची : डाळिंबात तयार केली ओळखकडवंची हे द्राक्षाचे गाव. याच गावातील ज्ञानेश्वर...
कडवंची : रोपवाटिका अन्‌ शेळीपालनाची जोडकडवंचीमधील सखाराम येडूबा क्षीरसागर यांनी केवळ...
कडवंची : पाणंदमुक्‍त रस्त्यांची...रस्ते, पाणी आणि वीज हे शेतीविकासातील महत्त्वाचे...
कडवंची : घरापुरते दूध अन् शेणखतासाठी...द्राक्षाचे गाव असलेल्या कडवंचीमधील प्रत्येक...
कडवंची : पाणलोटाचं स्वप्न साकारकडवंची गावात जल, मृद संधारण, शेती विकासामध्ये...
कडवंची : लोकसहभाग, पाणी व्यवस्थापन हेच...कडवंची गावात द्राक्षातून समृद्धी दिसत असली तर...
‘कडवंची ग्रेप्स’ ब्रँडसाठी कृषी...कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि...
कडवंची : संघर्षातून पेललंय आव्हानकडवंचीमधील महिलांनीदेखील द्राक्ष शेतीमध्ये...
कडवंची मॉडेल : कोरडवाहूसाठी दिशादर्शक...मराठवाड्यात पावसावर आधारित कोरडवाहू शेतीला बळकट...
कडवंची : द्राक्षाच्या थेट विक्रीद्वारे...कडवंचीमधील द्राक्ष बागायतदारांनी विविध राज्यांतील...
कडवंची : पीक बदलाच्या दिशेने; पपई...विहीर, शेततळ्याच्या माध्यमातून पाणी उपलब्ध...
कडवंची : जमीन सुपीकतेसाठी बायोगॅस स्लरी कडवंचीमधील शेतकऱ्यांनी बायोगॅस संयंत्राची उभारणी...
कडवंची : बागेला मिळाली यंत्रांची जोडप्रयोगशील द्राक्ष बागायतदार सुरेश दगडू पाटील...
कडवंची : जल, मृद्संधारणातूनच रुजलं...कडवंची गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खरपुडी...
कडवंची : पाणी व्यवस्थापन, नवतंत्रातून...काटेकोर पाणी आणि खतांचा वापर, पीक व्यवस्थापनात...
कडवंची : खरपुडी ‘केव्हीके’चे रोल मॉडेलकडवंची हे कृषी विज्ञान केंद्राचे पहिले दत्तक गाव...
‘वॉटर बजेट’ कडवंचीचे वैशिष्ट्यपाणलोट विकास, पीक बदल, पूरक उद्योगात मनापासून...
विदर्भातील संत्रा पट्ट्यात आंबिया...नागपूर ः विदर्भातील वाढत्या तापमानाचा संत्रा...
एनएचबी ‘एमडी’चा वाद पंतप्रधानांपर्यंतपुणे : देशातील शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेत...