agriculture news in marathi, Krishi Tourism Center to set up Solapur University | Agrowon

सोलापूर विद्यापीठ उभारणार कृषी पर्यटन केंद्र
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 जून 2018

सोलापूर  : सोलापूर विद्यापीठाच्या वतीने हिरज रोडवरील पाच एकर परिसरात कृषी पर्यटन केंद्र उभारण्यात येणार आहे. सध्या आराखडा बनविण्याचे काम सुरू असून, जानेवारी २०१९ पर्यंत हे कृषी पर्यटन केंद्र पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले.

कुलगुरुपदाची धुरा हाती घेतल्यानंतर डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी विद्यापीठाची गुणवत्ता सुधारणे आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा, या उद्देशाने विद्यापीठात व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन केले आहे.

सोलापूर  : सोलापूर विद्यापीठाच्या वतीने हिरज रोडवरील पाच एकर परिसरात कृषी पर्यटन केंद्र उभारण्यात येणार आहे. सध्या आराखडा बनविण्याचे काम सुरू असून, जानेवारी २०१९ पर्यंत हे कृषी पर्यटन केंद्र पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले.

कुलगुरुपदाची धुरा हाती घेतल्यानंतर डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी विद्यापीठाची गुणवत्ता सुधारणे आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा, या उद्देशाने विद्यापीठात व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन केले आहे.

भाषा अभ्यासक्रम, कौशल्यविकास अभ्यासक्रम, संशोधनावर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्याच्या दृष्टीने सध्या प्रयत्नही सुरू आहेत. विद्यापीठातील विद्यार्थ्यांबरोबरच पर्यटकांना निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेता यावा, यासाठी कृषी पर्यटन केंद्र उभारले जात आहे. त्याचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून, पुढील १५ दिवसांत प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होईल.

गाईड्‌सद्वारे पर्यटकांना कृषी पर्यटन केंद्रातील विविध प्रकारची माहिती देण्यात येणार आहे. राज्यातील अन्य विद्यापीठांच्या तुलनेत सोलापूर विद्यापीठाचा हा कृषी पर्यटन केंद्राचा नवा उपक्रम ठरणार आहे. याबाबत कुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनीही सोलापूर विद्यापीठाच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या कृषी पर्यटन केंद्रात विविध प्रकारची झाडे, पक्षी, स्वीमिंग टॅंक यासह सोलापूरच्या स्थानिक अनेक विषयांचा समावेश असेल, असे सांगितले.

 

 

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...