agriculture news in Marathi, Krishna Prakash Appointed for 'HT' Inquiry | Agrowon

‘एचटी’ प्रकरण कृष्णप्रकाश यांच्याकडे
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 6 मार्च 2018

मुंबई : परवानगी नसलेले तणनाशक सहनशील जनुक (हर्बीसाइड टॉलरंट ट्रान्सजेनिक जीन) वापरून बीटी बियाण्यांचे अवैधपणे उत्पादन, साठवणूक आणि विक्री केल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी कृषी खात्याने जाहीर केलेल्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) नेतृत्व आता राज्याच्या व्हीआयपी सुरक्षा विभागाचे प्रमुख विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश करणार आहेत.

याआधी राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त संजय बर्वे (भापोसे) यांच्या अध्यक्षतेखाली या एसआयटीची घोषणा करण्यात आली होती. मात्र, त्यांनी नकार दर्शविल्याने गेले तीन आठवडे दुसऱ्या सक्षम अधिकाऱ्याचा शोध सुरू होता.

मुंबई : परवानगी नसलेले तणनाशक सहनशील जनुक (हर्बीसाइड टॉलरंट ट्रान्सजेनिक जीन) वापरून बीटी बियाण्यांचे अवैधपणे उत्पादन, साठवणूक आणि विक्री केल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी कृषी खात्याने जाहीर केलेल्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) नेतृत्व आता राज्याच्या व्हीआयपी सुरक्षा विभागाचे प्रमुख विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश करणार आहेत.

याआधी राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त संजय बर्वे (भापोसे) यांच्या अध्यक्षतेखाली या एसआयटीची घोषणा करण्यात आली होती. मात्र, त्यांनी नकार दर्शविल्याने गेले तीन आठवडे दुसऱ्या सक्षम अधिकाऱ्याचा शोध सुरू होता.

राज्यातील आघाडीची बियाणे उत्पादक कंपनी असलेल्या महिको मॉन्सँटो बायो टेक (इंडिया) प्रा.लि., मॉन्सँटो होल्डींग्ज प्रा.लि., मॉन्सँटो इंडिया लिमिटेड या कंपन्यांसह इतर कंपन्यांचे हर्बीसाईड टॉलरंट ट्रान्सजेनिक जीण असलेल्या बी.टी. कापूस बियाण्यांचे अनधिकृतपणे राज्यातील उत्पादन, साठवणूक व विक्री यातील सहभाग, भूमिकेची चौकशी करून दोषी कंपन्यांवर कारवाईची शिफारस करण्याची जबाबदारी या एसआयटीवर सोपवण्यात आली आहे.

भारतात व्यावसायिक स्तरावर बीटी कापूस बियाणे बीजी १ आणि बीजी २ या दोनच वाणांना विक्रीस परवानगी आहे. तरीही बीटी कापसाच्या बियाण्यांमध्ये परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील असणारे जनूक वापरून बियाण्यांची अवैध विक्री होत असल्याची समोर आले आहे. सीआयसीआर संस्थेच्या अहवालानुसार जादू, एटीएम, बलभद्र, अर्जुन, कृष्णा-गोल्ड या पाच ब्रँडेड नावाच्या बीटी कापूस बियाण्यांमध्ये हर्बीसाईड टॉलरंट ट्रान्सजेनिक जीण अस्तित्वात असल्याचे दिसून आलेले आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्य सरकारने ७ फेब्रुवारी रोजी विशेष तपास पथकाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त संजय बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी जाहीर करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा श्री. बर्वे यांच्या नावाला सहमती दर्शवली होती.

मात्र, श्री. बर्वे हे स्वतः पोलिस महासंचालक दर्जाचे अधिकारी आहेत. त्यामुळे राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी परस्पर त्यांच्या नावाची शिफारस कशी काय केली यावरून श्री. बर्वे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते. तसेच त्यांनी एसआयटीचे काम करण्यासही नकार दर्शवला होता.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नागपूर विभागाच्या पोलिस महानिरीक्षकांच्या नावाची शिफारस केली होती. पण त्यांच्याकडेही कामाचा व्याप असल्याने आता कृष्णप्रकाश यांची नियुक्ती एसआयटी प्रमुखपदी करण्यात आली आहे. या एसआयटीमध्ये अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. या समितीत निमंत्रित सदस्य म्हणून तज्ज्ञ व्यक्तींना बोलावण्याचे अधिकार तपास पथकाच्या प्रमुखांना देण्यात आले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...