कणेरी मठाचे संशोधन शेतीला नवी दिशा देणारे ः कृष्णा राज

येथील सिद्धगिरी मठात रविवारी (ता. ११) कारागीर महोत्सवचे उद्‌घाटन गायीचे पूजन करून करताना केंद्रीय कृषी राज्यमंत्री कृष्णा राज, चंद्रकांत पाटील, श्री काडसिद्धेश्वर आदी.
येथील सिद्धगिरी मठात रविवारी (ता. ११) कारागीर महोत्सवचे उद्‌घाटन गायीचे पूजन करून करताना केंद्रीय कृषी राज्यमंत्री कृष्णा राज, चंद्रकांत पाटील, श्री काडसिद्धेश्वर आदी.

कोल्हापूर: कणेरी मठ ही देशभरातील संशोधनाची प्रयोगशाळा आहे. येथे जे प्रयोग होत असतात ते अफलातून आणि नव्या शेती तंत्रज्ञानाला एक नवी दिशा देणारे असतात, यामुळे केंद्र शासनाचा मठाच्या प्रयोगांत सक्रिय सहभाग असेल, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी राज्यमंत्री श्रीमती कृष्णा राज यांनी रविवारी (ता. ११) यांनी कणेरी (ता. करवीर)येथे केले. सिद्धगिरी मठावर रविवारपासून (ता. ११) कारागीर महाकुंभ मेळाव्याचे उद्घाटन त्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले, त्या वेळी ते बोलत होते. देशभरातील सुमारे दोनशे कारागीर आपली कला या महोत्सवात सादर करणार आहेत. श्रीमती कृष्णा राज म्हणाल्या, केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वतीने विविध योजना राबवण्यात येत आहेत. या योजना राबवताना कणेरी मठाने राबवलेले अनेक थक्क करणारे आणि शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारे प्रयोग राबवले आहेत. ते यशस्वी केले आहेत. हे प्रयोग पाहण्यासाठी आम्ही भारतीय अनुसंधान केंद्राच्या अधिकाऱ्यांनाही कणेरीला पाठवत आहाेत. याचा निश्चित उपयोग आम्हाला शेतीविषयक धोरण ठरवताना होणार आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कणेरी मठ देशात प्रसिद्ध व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्याप्रमाणे देशात अक्षरधामसारखी मंदिरे आकर्षण आहेत, तसेच प्रयोग येथे करण्यात येणार आहेत. कणेरीच्या विकासकामासाठी ८५ लाख रुपये व रस्त्यांसाठी साडेतीन कोटी रुपये देणार आहे. मठाधिपती श्री काडसिद्धेश्वर यांनी कारागीर महोत्सवाच्या आयोजनाचा हेतू सांगितला. कारागीर बळकट करून ग्रामसुधारणा करण्यासाठी मठाच्या वतीने करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. या वेळी गुजरातचे स्वामी नारायण संस्थेचे पुज्यपाद त्यागवल्लभ दास, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, बसंतसिंग, यशवर्धन बारामतीकर, आणासाहेब डांगे, आणासाहेब ज्वेले, रत्नेश शिरोळकर, हरपालसिंग आदी उपस्थित होते.

पहिल्याच दिवशी गर्दी कारागीर महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मठस्थळी गर्दी झाली. मठाच्या ठिकाणी आयोजित बारा बलुतेदारांच्या कला प्रत्यक्षात सादर करण्यात आला. या वेळी विविध जातीच्या गोवंशाचे प्रदर्शनही भरवण्यात आले आहे. १५ तारखेपर्यंत हा महोसत्व चालणार आहे. देशभरातील विविध कलाकुसरीच्या वस्तूही प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. दुपारी सिद्धीगिरी गो प्रदर्शनाचे उदघाटन केंद्रीय मंत्री कृष्णा राज यांच्या हस्ते झाले. या गो प्रदर्शन या विषयावर परिसंवाद झाला. तिसऱ्या सत्रात सायंकाळी ग्रामसंस्कृती उत्सव झाला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com