पूर्व भागात कृष्णा, वारणा नद्या पडल्या कोरड्या

पूर्व भागात कृष्णा, वारणा नद्या पडल्या कोरड्या
पूर्व भागात कृष्णा, वारणा नद्या पडल्या कोरड्या

कोल्हापूर : जिल्ह्याच्या पूर्व भागात कृष्णा व वारणा नद्या कोरड्या पडल्याने या तालुक्यातील गावापुढे शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. अनेक ठिकाणी प्रदूषित पाणीच नद्यांमध्ये असल्याने त्याचा गंभीर परिणाम ग्रामीण भागांवर होत आहे

उन्हाळ्याच्या सुरवातीलाच कृष्णा नदी कोरडी ठणठणीत पडली आहे. केवळ दूषित पाणी प्रवाहित झाल्याचे चित्र आहे. उदगाव (ता. शिरोळ) येथून जयसिंगपूर शहरासाठी पाण्याचा उपसा होतो. मात्र काही दिवसांत पाणी उपशावर मर्यादा येणार आल्याने शहरासह शिरोळ तालुक्यातील सुमारे ३५ गावांमध्ये पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक पाटबंधारे विभागाने पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. 

नदी पात्रात पाणी न आल्यास शहरासह विविध गावांच्या पाणी योजना बंद पडण्याची भीती आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने नेटके नियोजन करून वारणा चांदोली धरण व कृष्णा कोयना धरणातून पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे.

शिरोळ तालुका हा समृद्ध तालुका म्हणून ओळख आहे. वारणा, कृष्णा, पंचगंगा व दूधगंगा या चार नद्यांमुळे तालुक्यात बारमाही पाण्याची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी पाण्याच्या मुबलकतेमुळे भाजीपाल्यासह अन्य पिके घेताता. मात्र नदीपात्रात पाण्याची कमरता भासल्याने सिंचन योजना बंद पडल्याने पाणीपुरवठा ठप्प होते. त्यामुळे नियोजन कोलमडत असून, शेतकरी अार्थिक संकटात सापडत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com