agriculture news in Marathi, krushi sanjavani project agreement done in Delhi, Maharashtra | Agrowon

कृषी संजीवनी प्रकल्पाचे एक पाऊल पुढे
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 जानेवारी 2018

मुंबई : विदर्भ, मराठवाडा आणि खारपाण पट्ट्यातील ५,१४९ गावांमध्ये जागतिक बॅंकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात येणाऱ्या ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा’च्या अंमलबजावणी आराखड्यावर शुक्रवारी (ता. १९) शिक्कामोर्तब करण्यात आले. नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत प्रकल्प करारनाम्याच्या मसुद्यावर जागतिक बॅंकेसोबत सह्या करण्यात आल्या. प्रकल्पात समाविष्ट असलेल्या गावांमध्ये येत्या शुक्रवारी २६ जानेवारी रोजी ग्रामसभा घेऊन प्रकल्पाबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी दिली.

मुंबई : विदर्भ, मराठवाडा आणि खारपाण पट्ट्यातील ५,१४९ गावांमध्ये जागतिक बॅंकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात येणाऱ्या ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा’च्या अंमलबजावणी आराखड्यावर शुक्रवारी (ता. १९) शिक्कामोर्तब करण्यात आले. नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत प्रकल्प करारनाम्याच्या मसुद्यावर जागतिक बॅंकेसोबत सह्या करण्यात आल्या. प्रकल्पात समाविष्ट असलेल्या गावांमध्ये येत्या शुक्रवारी २६ जानेवारी रोजी ग्रामसभा घेऊन प्रकल्पाबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी दिली.

राज्याच्या मराठवाडा, विदर्भ या दुष्काळग्रस्त भागाकडे शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. हवामानावर आधारित शेती करताना शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवितानाच सहभागी गावांतील जमिनीचे मृद संधारण करण्यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. या प्रकल्पात विदर्भ आणि मराठवाड्यातील १५ जिल्ह्यांचा समावेश आहे. पुढील सहा वर्षे हा प्रकल्प राबविण्यात येईल. या प्रकल्पासाठीचा कर्जविषयक करार मसुदा तसेच प्रकल्प अंमलबजावणी मसुद्यास नवी दिल्ली येथे जागतिक बॅंकेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत अंतिम स्वरूप देण्यात आले. 

या वेळी राज्य शासनाच्या वतीने वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव आर. ए. राजीव, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार, प्रकल्प संचालक विकास रस्तोगी उपस्थित होते. या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जागतिक बॅंकेच्या मुख्यालयातील अधिकारी सहभागी झाले होते. त्यांच्याकडून करारनाम्याचा मसुदा अंतिम झाल्यानंतर केंद्र शासनाचे वित्त विभागाचे अधिकारी आणि प्रधान सचिव विजयकुमार यांनी जागतिक बॅंकेसोबतच्या करारावर सह्या केल्या. 

२८०० कोटी कर्ज मिळणार 
२७ फेब्रुवारी रोजी जागतिक बॅंकेच्या कार्यकारी संचालक मंडळाची बैठक होणार असून, त्यात या कराराबाबत औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्याला सुमारे २८०० कोटी रुपयांचे अल्प व्याज दरातील कर्ज जागतिक बॅंकेकडून मिळणार आहे. येत्या मार्च महिन्यापासून प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरवात होईल, असे प्रधान सचिव विजयकुमार यांनी सांगितले. २६ जानेवारी रोजी ग्रामसभांमधून प्रकल्पात समावेश असलेल्या गावांमध्ये जनप्रबोधनाचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या प्रधान सचिवांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
कोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...
जपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...
कुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...
नाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...
सांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...
अॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे  : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...
अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे  ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...
दुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई   ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...