agriculture news in Marathi, Krushik exhibition will start from 19 January in Baramati, Maharashtra | Agrowon

बारामतीत कृषिक प्रदर्शन १९ जानेवारीपासून
टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 जानेवारी 2018

बारामती, जि. पुणे ः येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या कृषिक प्रदर्शनास प्रारंभ व कृषी विज्ञान केंद्राचा रौप्यमहोत्सव येत्या १९ जानेवारी रोजी एकत्रित होणार आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, जलसंपदामंत्री विजय शिवतारे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत होणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

बारामती, जि. पुणे ः येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या कृषिक प्रदर्शनास प्रारंभ व कृषी विज्ञान केंद्राचा रौप्यमहोत्सव येत्या १९ जानेवारी रोजी एकत्रित होणार आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, जलसंपदामंत्री विजय शिवतारे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत होणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी केव्हीकेचे प्रमुख डॉ. सय्यद शाकीरअली उपस्थित होते. चार दिवस सुरू राहणाऱ्या कृषिक प्रदर्शनामध्ये या वर्षी जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने जनावरांचेही प्रदर्शन होणार असून, ८० जातींची विविध जनावरे या प्रदर्शनात असतील.

खिलार, देवणी त्याचबरोबर श्वानाचेही प्रदर्शन यामध्ये होणार असून ग्रेहॉन्ड, पब, जर्मन शेपर्ड, कारवान, लॅब्राडॉर, डॉबरमॅन, बुलडॉग आदींसह इतरही जातींची कुत्री या प्रदर्शनात सहभागी असतील. 

व्यावसायिक शेतकऱ्यांना हे प्रदर्शन अधिक सखोलपणे पाहता यावे, यासाठी १९ व २० जानेवारी रोजी प्रवेशशुल्क आकारले जाणार असून २१ व २२ जानेवारी रोजी निःशुल्क राहणार आहे. या प्रदर्शनात भीमथडी यात्रेप्रमाणेच विषमुक्त अन्न ही संकल्पना राबविण्यासाठी अन्नदाता हे स्वतंत्र दालन यामध्ये राहणार आहे. 

सात तालुक्यांतील लोकप्रतिनिधींना निमंत्रण
प्रदर्शनाच्या निमित्ताने केव्हीकेचा रौप्यमहोत्सव आयोजित केला असून, १९ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता अप्पासाहेब पवार सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. केव्हीकेच्य़ा कार्यक्षेत्रातील सात तालुक्यांतील आमदार या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती राजेंद्र पवार यांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...