agriculture news in marathi, Krushna river shore villages under severe water scarcity | Agrowon

‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला; २०० गावांत भीषण पाणीटंचाई
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 मे 2019

कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक राज्यातील २०० हून अधिक गावांत गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाई भासत आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या समन्वयातून पाणीटंचाई दूर होणे शक्य असताना, याबाबत कार्यवाही होत नसल्याने या गावांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक राज्यातील २०० हून अधिक गावांत गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाई भासत आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या समन्वयातून पाणीटंचाई दूर होणे शक्य असताना, याबाबत कार्यवाही होत नसल्याने या गावांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हिप्परगी गावापर्यंतच्या सुमारे २०० हून अधिक गावांत ४५० टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. कृष्णा नदीपात्रात शिरोळ तालुक्यात असलेल्या राजापूर बंधाऱ्यापर्यंत कोयना, चांदोली व काळम्मावाडी धरणाचे पाणी उपलब्ध आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून राजापूर बंधाऱ्याच्या पुढील असलेल्या बेळगाव, विजापूर, बागलकोट जिल्ह्यांतील हिप्परगी धरणापर्यंतच्या २०० हून अधिक गावांत पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी चिक्कोडी तालुक्यात ११८, रायबाग २१, अथणी ६१, कागवाड २८, तर रबकव्वी बनहट्टीत ३० यांसह अन्य तालुक्यांत कृष्णाकाठावरील गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सुमारे सहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या गावात पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे.

नियोजनाचा फटका गावांना
कर्नाटकाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेऊन कर्नाटकाला कोयनेतून पाणी द्या, अशी मागणी केली होती. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्नाटकला पाणी देऊ, असा निर्णय झाला होता, त्या बदल्यात अलमट्टीचे पाणी जत, सोलापूरला द्यावे. अशीही मागणी केली होती. पण पुढे कोणतीच अंमलबजावणी न झाल्याने याचा फटका या गावांना बसत आहे.

पोलिस बंदोबस्त मागवला
२००३ ला कोल्हापूर जिल्ह्यातील राजापूर (ता. शिरोळ) बंधाऱ्यापुढील असलेल्या हिप्परगी धरणापर्यंतच्या गावांना दोन महिने पाणी नसल्याने कर्नाटकातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन जेसीबीच्या साह्याने राजापूर बंधाऱ्याचे बरगे काढून बंधारा पाडण्याचा प्रयत्न केला होता. सध्या ही बिकट परिस्थिती असल्याने खबरदारी म्हणून राजापूर पाटबंधारे विभागाने पोलिस बंदोबस्त मागवला आहे.

बिकट परिस्थिती
कर्नाटक सीमाभागात कृष्णा नदी तीन महिन्यांपासून कोरडी पडल्याने विहिरीबरोबर कूपनलिकाही कोरड्या पडल्या आहेत. अशा परिस्थितीत टँकरचे पाणी पुरत नसल्याचे चित्र आहे, त्यामुळे कृष्णा नदीपात्रात खड्डे पाडून तांब्याचे साह्याने पिण्यासाठी पाणी गोळा करण्याचे काम रायबाग, कुडची, तेरदाळ परिसरात दिसून येत आहे. जिवापाड जतन केलेली पिकेही वाळली असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

इतर ताज्या घडामोडी
कृषी भूसुक्ष्मजीवशास्त्रातील तथ्येमागील भागामध्ये उल्लेख आलेल्या डॉ. रंगास्वामी...
योग्य वेळी करा कडधान्य पेरणीमूग, उडीद :     मध्यम ते...
नियोजन चारा पिकांचे...सकस चाराउत्पादन केल्यास जास्तीत जास्त पोषणमूल्ये...
संत्रा, मोसंबी उत्पादकांना हेक्टरी एक...अमरावती : जिल्ह्यातील तापमान, पाणीटंचाई आणि...
विखे, क्षीरसागरांना मंत्रीपदे देऊन...नाशिक : ‘‘घटना माहीत असूनही त्याविरोधात निर्णय...
पाऊसकाळातही मराठवाडा टॅंकरग्रस्त औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ५७ लाख...
रत्नागिरी : बळिराजाला आता आर्द्रा...रत्नागिरी :  मृग नक्षत्रात पावसाने पाठ...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील ८४...लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर...
सांगलीसह पश्‍चिमेकडे पाऊस सांगली : दोन दिवसांपासून पावसाने पश्‍चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
सोलापूर झेडपी सदस्यांची दुष्काळापेक्षा...सोलापूर : दुष्काळाच्या दाहकतेत जिल्हा पुरता...
नाशिकमध्ये वांगी ३००० ते ६००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात होणार...पुणे : दरवर्षी शेती कामांसाठी मजुरांची चांगलीच...
बांबू उत्पादनवाढीसाठी पुणे जिल्ह्यातील...पुणे  ः बांबू उत्पादनवाढीसाठी भोर, वेल्हा...
नगर जिल्ह्यातील ६३६ वैयक्तिक पाणी योजना...नगर  ः जिल्ह्यात यंदा दुष्काळाचा सर्वाधिक...
पाच जिल्ह्यांतील ६६८ छावण्यांमध्ये चार...औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत...
पीकविमा अर्ज करण्यासाठी तालुका कृषी...मुंबई ः पीकविम्याबाबतच्या तक्रारी लक्षात...
‘लोकमंगल’प्रकरणी विधान परिषदेत गोंधळमुंबई : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना लेखी,...मुंबई ः राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील...
दोषी कंपनीलाच शासनाचे १५ कोटींचे...मुंबई : केंद्र सरकारच्या ‘आयएलएफएस’ या...