सोलापूर जिल्ह्यात कुरनूर धरण १०० टक्‍के भरले

कुरनूर जि. सोलापूर : येथील धरण १०० टक्के भरल्याने धरणाच्या दरवाजातून सोडण्यात आलेले पाणी.
कुरनूर जि. सोलापूर : येथील धरण १०० टक्के भरल्याने धरणाच्या दरवाजातून सोडण्यात आलेले पाणी.

अक्कलकोट, जि. सोलापूर  : कुरनूर (ता. अक्कलकोट) येथील धरण १०० टक्‍के भरले आहे. यामुळे तालुक्‍याच्या ४० हून अधिक बोरी नदीकाठच्या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न मिटण्यास मदत होणार आहे.

कुरनूर येथील धरण काल रात्री नळदुर्ग, इटकळ भागातील पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने १०० टक्के भरले आहे. या धरणाची क्षमता ८२२ दशलक्ष घनफूट इतकी आहे. धरणाचे तीन दरवाजे सकाळी उघडून ४५० क्‍युसेकने पाणी सोडले जात होते.

परंतु, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने जेवढे पाणी वरून येत आहे तेवढे खाली सोडले जात आहे. त्यामुळे सायंकाळी पाच वाजता ९०० क्‍युसेकने पाणी सोडले. यामुळे सांगवी, संगोगी व बबलादसह खालील बंधारे या पाण्याने भरले जातील आणि शेतकऱ्यांना पाण्याची सोय होईल.

यावर्षी संपूर्ण पावसाळा संपत आला असताना धरणाची पातळी ३० ते ३५ टक्‍क्‍यांच्या वर आली नव्हती. यामुळे धरणावर अक्कलकोट शहर, मैंदर्गी व दुधनी नगरपरिषदांसह नदीकाठच्या गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असल्याने जास्त चिंता व्यक्त केली जात होती. परंतु, धरण पूर्ण भरून त्यातून पाणी सोडल्याने समाधान व्यक्त होत आहे. पाण्याचा वेग कमी झाल्यास तातडीने सर्व बंधाऱ्यांना दरवाजे बसविल्यास बंधारे भरतील. त्याचा फायदा रब्बी हंगामाला होईल.

यामुळे भविष्यात पुन्हा लवकर पाणी सोडण्याची वेळ येणार नाही याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. मोट्याळ आणि सिंदखेड गावांमधून बोरी नदी वाहत असल्याने गावचा संपर्क तुटला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com