agriculture news in marathi, labor organizations Works to be done by up to a crore rupees, In the year | Agrowon

मजूर संस्थांना वर्षात एक कोटी रुपयांपर्यंतची कामे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 जुलै 2018

सोलापूर : राज्यातील मजूर सहकारी संस्थांना एका वर्षामध्ये १ कोटींची कामे करता येणार आहेत. त्याबाबतचा निर्णय सरकारने नुकताच घेतला आहे. त्यामुळे २७ हजार मजूर सहकारी संस्थांना दिलासा मिळाला आहे.

सोलापूर : राज्यातील मजूर सहकारी संस्थांना एका वर्षामध्ये १ कोटींची कामे करता येणार आहेत. त्याबाबतचा निर्णय सरकारने नुकताच घेतला आहे. त्यामुळे २७ हजार मजूर सहकारी संस्थांना दिलासा मिळाला आहे.

राज्यात ३६ मजूर फेडरेशन आहेत. त्याचबरोबर २७ हजार पात्र मजूर संस्था कार्यरत आहेत. या संस्थांना कामवाटप समितीमार्फत तीन लाखांपर्यंतची कामेवाटप केली जात होती. १५ लाख रुपये असलेली ही मर्यादा ३ लाख केल्याने या संस्था अडचणीत आल्या होत्या. तीन लाखांच्या वरील कामे ई-निविदांच्या माध्यमातून घ्यावी लागत होती. त्याची मर्यादा ‘अ'' वर्गातील संस्थेला १५, तर ‘ब'' वर्गातील संस्थेला साडेसात लाख इतकी होती. याबरोबरच वर्षाला केवळ ५० लाखांपर्यंतची कामे करता येत होती.

राज्य मजूर फेडरेशनच्या वतीने ही मर्यादा वाढविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे दोन वेळा बैठक झाली होती. ‘अ'' वर्गाच्या मजूर संस्थेला ३०, तर ‘ब'' वर्गाच्या संस्थेला १५ लाख रुपयांच्या कामाची मर्यादा ई-निविदा प्रणालीच्या माध्यमातून देण्याची मागणी राज्य मजूर फेडरेशनने केली होती. ती मान्य करत शासनाने याबाबत सोमवारी (ता. २३) आदेश काढला आहे. त्यानुसार ‘अ'' वर्गातील संस्थेला ३०, तर ‘ब'' वर्गातील संस्थेला १५ लाख रुपयांची कामे ई-निविदेच्या माध्यमातून करता येणार आहेत. त्यामुळे मजूर संस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता अडचणीत आलेल्या मजूर संस्था बाहेर येतील. त्यांना पूर्वीसारखी कामे मिळतील़़, असे जिल्हा लेबर फेडरेशनचे अध्यक्ष बाबासाहेब कारंडे यांनी सांगितले.
टॅग्स

इतर बातम्या
धन जोप्या पाऊस, पीक मरू देईना अन्‌ वाचू...झळा दुष्काळाच्या : जि, परभणी यंदा पावसात कसा जोर...
राज्यात भेंडी ५०० ते ३००० रुपये...सांगलीत दहा किलोस २५० ते ३०० रुपये  सांगली...
राज्याचा पुरोगामित्वाचा वारसा जपूया :...मुंबई: शेती, पाणी, गुंतवणूक, गृहनिर्माण अशा विविध...
‘अटलपर्वा’चा अस्तनवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...
विदर्भात पावसाचे जोरदार कमबॅकनागपूर ः गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या...
शिराळ्यात नागप्रतिमेची पूजाशिराळा, जि. सांगली ः  अनेक वर्षे जिवंत...
बोंड अळी नियंत्रणासाठी...पुणे : राज्यात कपाशीतील बोंड अळीचे संकट वाढण्याची...
अकोल्यात पावसाचे आगमनअकोला : या भागात गेल्या २० पेक्षा अधिक...
अजातशत्रूदेशाच्या राजकारणात आपल्या शालीन, सभ्य राजकारणाने...
मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर सर्वदूर पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर...
बेबाकी प्रमाणपत्राशिवाय राष्ट्रीय...मुंबई: पाऊस न पडल्याने आधीच त्रस्त असलेल्या...
राज्यात सर्वदूर पाऊसपुणे ः राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (...
उत्पादनवाढीसाठी एअरोसोल्सद्वारे...पृथ्वीच्या वातावरणामध्ये कृत्रिमरीत्या सल्फेट...
पुणे जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...
सोलापुरात भीजपाऊस, खरीप पिकांना दिलासा सोलापूर ः प्रदीर्घ विश्रांतीनंतर सोलापूर...
राजकीय सभ्यता व सुसंस्कृतपणा जपणारा एक...पुणे : राजकिय विरोध कितीही असला तरी राजकारणातील...
देशाने महान पुत्र गमावला : राहुल गांधी नवी दिल्ली : ''आज भारताने महान पुत्र गमावला...
वाजपेयींच्या निधनाने एका युगाचा अंत :...नवी दिल्ली : ''अटलजींच्या निधनाने एका युगाचा...
अजातशत्रू, मुरब्बी राजकारणी : अटल...शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे,...
...या आजारांनी वाजपेयींना ग्रासले होतेनवी दिल्लीः माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...