agriculture news in marathi, Labor shortage for onion Planting | Agrowon

उन्हाळ कांदा लागवडीला मजूरटंचाईचा अडथळा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

नाशिक  : दिवाळीनंतर उन्हाळ कांदा लागवडीला नाशिक जिल्ह्यात वेग आला आहे. यंदा जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये झालेला जोरदार पाऊस आणि सध्या कांद्याला मिळणारे चांगले दर, यामुळे कांदा क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे; मात्र शेतमजुरांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा पैसे देऊन मजूर मिळवावे लागत असल्याने फक्त कांदा लागवडीचा प्रतिएकर खर्च सात हजारांवर पोचला आहे.

नाशिक  : दिवाळीनंतर उन्हाळ कांदा लागवडीला नाशिक जिल्ह्यात वेग आला आहे. यंदा जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये झालेला जोरदार पाऊस आणि सध्या कांद्याला मिळणारे चांगले दर, यामुळे कांदा क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे; मात्र शेतमजुरांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा पैसे देऊन मजूर मिळवावे लागत असल्याने फक्त कांदा लागवडीचा प्रतिएकर खर्च सात हजारांवर पोचला आहे.

कांदा उत्पादनात नाशिक जिल्ह्याचे नाव देशभरात आघाडीवर आहे. लासलगाव, पिंपळगाव बाजार समितीतून तर जगभरात कांद्याची निर्यात केली जाते. सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला असतानाच आता उत्पादन खर्चात झालेल्या वाढीमुळे कांदा आतापासूनच शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणू लागला आहे.

शेतकऱ्यांना एकर किंवा गुंठेवारीनुसार मजुरांकडून लागवड करून घ्यावी लागते; मात्र त्यासाठी एका एकराला सात ते साडेसात हजार रुपये मोजावे लागत आहेत. मजुरांची मागणी वाढल्यास या रकमेत अधिक वाढ होते. शिवाय मजूर दुसऱ्या गावातून आणण्याची वेळ पडल्यास वाहतुकीवरही अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांनाच करावा लागत आहे. मागील वर्षीच्या प्रमाणात यंदा मजुरीत वाढ झाली असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

इतर ताज्या घडामोडी
कोबीवरील भुरी, घाण्या रोगनियंत्रणराज्यात गेल्या काही दिवसांत अवकाळी पाऊस व गारपीट...
अधिक उत्पादन, साखर उताऱ्यासाठी फुले १०,...ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देणाऱ्या...
स्थलांतरित गावांतही मिळणार रेशनचे...नगर : रोजगारासाठी गाव सोडलेल्या कुटुंबांना आता...
नाशिक विभाग ‘मनरेगा’ची मजुरी जमा...नाशिक  : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पेटून उठासेलू, जि. परभणी : कधी गारपीट, कधी अवकाळी पाऊस,...
बायफचा फ्रान्स सरकारकडून गौरव पुणे : पशुसंवर्धन, ग्रामविकास व शेती क्षेत्रात...
परभणी जिल्ह्यातील १४ हजार जनावरांना इअर...परभणी : पशुसंवर्धन विभागांतर्गत राबविण्यात येत...
जळगाव जिल्ह्यात हवामानाचा बाजरी उगवणीवर...जळगाव  ः जिल्ह्यात बाजरीची पेरणी काही...
कर्जमाफीच्या २१ लाख शेतकऱ्यांचे खाते '...यवतमाळ : कर्जमाफी अंतिम टप्प्यात आली आहे....
नगर जिल्ह्यात `नरेगा’च्या कामांवर...नगर : मजुरांना रोजगार मिळावा म्हणून राबवल्या...
वऱ्हाडात कांदा बिजोत्पादनाला गारपिटीचा...अकोला ः कांदा बिजोत्पादनाचे मोठे क्षेत्र असणाऱ्या...
हमीभाव : धूळफेकीचे चक्र पूर्ण सत्तेवर येण्यापूर्वी दिलेली आश्वासने सत्तेवर...
सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी :...दीडपट हमीभावाची सरकारची घोषणा ही शुद्ध बनवाबनवी...
उत्पादन खर्चाबद्दल खुलासा करावा : डॉ....केंद्र सरकारने आगामी खरिपात सर्व अघोषित पिकांसाठी...
मराठवाड्यातील लघू प्रकल्प आले २७ टक्‍क्...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८६४ लघू, मध्यम, मोठ्या...
गारपीटग्रस्त केळी बाग सुधारणेच्या...अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे  केळी पिकाचे कमी-...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १५...नांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
जळगाव जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात...जळगाव  : जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प यंदा सहा...
ब्रॉयलर्स बाजार दहा रुपयांनी उसळला,...ब्रॉयलर्सचा बाजार अपेक्षेप्रमाणे जोरदार उसळी...
पुण्यात कलिंगड, खरबुजाच्या आवकेत वाढपुणे : गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये...