agriculture news in marathi, labour shortage for sugarcane cutting, sangli, maharashtra | Agrowon

ऊसतोडणी मजुरांअभावी सांगलीतील शेतकऱ्यांची चिंता वाढली
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 2 मार्च 2018
सांगली  ः चालू गळीत हंगामात ऊसतोडणी मजुरांची कमतरता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गाळप हंगाम मध्यावर आला आहे. ऊसतोडणीसाठी शेतकरी कारखान्यावर हेलपाटे मारत आहेत. मात्र मजूर उपलब्ध होत नसल्याने कारखान्याला ऊस पाठवताना शेतकऱ्याची पुरती दमछाक होताना दिसत आहे. 
 
अनेक ठिकाणी फडकरींना "रोकड'' दिल्याशिवाय तोड मिळणे अवघड झाले आहे. आधीच कमी दराचे चटके सोसत असताना तोडीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागल्याने ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
 
सांगली  ः चालू गळीत हंगामात ऊसतोडणी मजुरांची कमतरता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गाळप हंगाम मध्यावर आला आहे. ऊसतोडणीसाठी शेतकरी कारखान्यावर हेलपाटे मारत आहेत. मात्र मजूर उपलब्ध होत नसल्याने कारखान्याला ऊस पाठवताना शेतकऱ्याची पुरती दमछाक होताना दिसत आहे. 
 
अनेक ठिकाणी फडकरींना "रोकड'' दिल्याशिवाय तोड मिळणे अवघड झाले आहे. आधीच कमी दराचे चटके सोसत असताना तोडीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागल्याने ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
 
जिल्ह्यात तेरा साखर कारखाने सुरू आहेत. मात्र, गेल्या वर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यात सुमारे ३० टक्‍क्‍यांनी मजूरसंख्या घटली आहे. याचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागला आहे. त्यातच जिल्ह्यात केवळ सहा कारखान्यांकडे ऊसतोडणी यंत्रे आहेत. मात्र, ही मोठ्या क्षेत्रावरच चालतात. असे असताना वेळेत उसाला तोड मिळत नाही. 
यामुळे शेतकरी अस्वस्थ आहेत.
 
कारखान्यांच्या गट कार्यालयात प्रोग्रॅममध्ये नाव आले आहे का, हे पाहण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी हेलपाटे मारून त्रस्त झाला आहे. प्रोग्रॅममध्ये नाव व क्रमांक येऊनही फडकरी शेतात येण्यास तयार नाहीत. मुळातच प्रत्येक कारखान्याच्या साधारणतः दोन ते पाच टोळ्या तेही पाच तिथे आठ कोयते असलेल्या आहेत. यामुळे ऊस तुटण्यास विलंब होत आहे.
 
स्लिप बॉयचे फडकरी ऐकत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. या कारणास्तव सुरवातीला तोड मिळण्यासाठी दीड हजार रुपये मोजणारा बळिराजा आता पाच हजारांवर रक्‍कम मोजत आहे. पैसे घे पण लवकर तोड दे, अशी विनंती करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पैसे देऊन तोडीस सुरवात झाली की दोन दिवसांनी फड अर्ध्यावर सोडून टोळ्या दुसरीकडे तोड चालू करत आहेत. पैशांच्या हव्यासापोटी टोळ्या शेतकऱ्यांना अडकवून ठेवत आहेत. एकच टोळी दोन ते चार कारखान्यांना ऊस पाठवण्याचे प्रकार होत आहेत. चार दिवसांतून एक खेप कारखान्याला जात आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...