नगर जिल्ह्यात `नरेगा’च्या कामांवर साडेसहा हजार मजूर

रोजगार हमी योजना
रोजगार हमी योजना

नगर : मजुरांना रोजगार मिळावा म्हणून राबवल्या जाणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांच्या  (नरेगा) कामावर सध्या नगर जिल्ह्यामध्ये अवघे साडेसहा हजार मजूर आहेत. जिल्हाभरात १ हजार ६२९ कामे सुरू आहे. ग्रामपंचायतींच्या कामावर मात्र मजुरांची संख्या मोजकीच आहे.

ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार मिळावा यासाठी सिंचन विहिरीसह सुमारे चोवीस प्रकारची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (नरेगा) केली जातात. ग्रामपंचायत, कृषी, वनविभाग, सामाजिक वनीकरण, लघुपाटबंधारे यासह अन्य यंत्रणामार्फत ही कामे केली जात आहेत.

जिल्हाभरातील ग्रामपंचायतींनी आतापर्यंत सुमारे २१ हजार ३३३, तर अन्य यंत्रणांनी १३ हजार ६०३ अशी ३४ हजार ९३६ कामे मंजूर केलेली आहेत. या कामांतून सुमारे पंचवीस लाख ४८ हजार मजुरांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. मात्र मजुरांनी मागणी केल्यानंतरच ही कामे सुरू केली जाणार आहेत.

सध्या ग्रामपंचायतीच्या ८६७ कामांवर  २ हजार ९००, तर यंत्रणांच्या ७६२  कांमावर ३ हजार ७८४ असे ६ हजार ६८४ मजूर कामांवर असल्याचा ग्रामपंचायत विभागाचा अहवाल आहे. जिल्ह्यामधील मजूर नोंदणीचा विचार करता नरेगाच्या कामावर मजुरांची वानवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यामधील १३११ ग्रामपंचायतींपैकी अनेक ग्रामपंचायतींमध्ये कामेच सुरु नाहीत.

तालुकानिहाय कामे (कंसात मजूर संख्या) अकोले ः १२२ (४०५), जामखेड ः १९५ (९८०), कर्जत ः १२३ (४२२), कोपरगाव ः ९७ (२०७), नगर ः ११६ (४८०), नेवासा ः ७९ (२०४), पारनेर ः १३२ (५७३), पाथर्डी ः १३५ (८५९), राहाता ः १७६ (३९३), राहुरी ः ५९ (२९६), संगमनेर ः १८४ (९३९). शेवगाव ः ८३ (३९८), श्रीगोंदा ः ८८ (३६२), श्रीरामपुर ः ४० (१६६).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com