पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे.
अॅग्रो विशेष
सांगली ः जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात पशुसंवर्धन विभागाचे दवाखाने नसल्याने जनावरांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. एकूण जनावरांच्या तुलनेत सुमारे ४२ दवाखान्यांची कमतरता जिल्ह्यात आहे. परिणामी जनावरांना वेळेत उपचार मिळणे कठीण होत आहे. अपुऱ्या दवाखान्याच्या संख्येमुळे पशुपालकातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
सांगली ः जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात पशुसंवर्धन विभागाचे दवाखाने नसल्याने जनावरांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. एकूण जनावरांच्या तुलनेत सुमारे ४२ दवाखान्यांची कमतरता जिल्ह्यात आहे. परिणामी जनावरांना वेळेत उपचार मिळणे कठीण होत आहे. अपुऱ्या दवाखान्याच्या संख्येमुळे पशुपालकातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
जिल्ह्यात सुमारे १८ लाख जनावरे आहेत. या जनावरांचे उपचार व्हावेत, यासाठी प्रत्येक तालुक्यात दवाखाने सुरू झाले. त्यामुळे पशुपालकांना जनावरांना वेळेत उपचार मिळू लागला. मात्र, जिल्ह्यात एकूण १९५ दवाखान्यांची गरज आहे. मात्र सध्या १५३ दवाखाने कार्यरत आहेत. अजून ४२ दवाखान्यांची गरज आहे. २०१२-१३ पासून ४२ दवाखाने प्रलंबित आहेत. मात्र, जिल्हा परिषद आणि राज्य पशुसंवर्धन विभागाने सातत्याने ४२ दवाखाने मजूर करावी, अशी मागणी केली असल्याचे सांगितले जाते आहे. मात्र, गेल्या पाच ते सहा वर्षांत मागणी करूनदेखील अद्यापही मंजूर झालेले नाहीत. याचाच अर्थ असा, की केवळ संबंधित विभागाने पाठपुरावा केला नसल्याची चर्चा पशुपालकांमध्ये सुरू आहे.
दरम्यान, नवीन दवाखाने उभा करायचे असल्यास डीपीडीसीकडून मान्यता घेऊन रकमेची तरतूद करावी, असे सांगण्यात आले आहे. मात्र, डीपीडीसीकडून याला मान्यताच मिळत नाही. त्यामुळे तरतूद कशी होणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. दुष्काळी भागातील आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, खानापूर, तासगाव या तालुक्यांत शेतीला जोडव्यवसाय म्हणून पशुपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. जत तालुक्यात ९ दवाखाने प्रलंबित आहेत. दवाखाने नसल्याने या भागातील जनावरांचे हाल होत आहेत. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील अनुशेष असणारे दवाखाने लवकरात लवकर भरून काढावेत, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे. जनावरांच्या तुलनेत दवाखाने कमी असल्याने पशुपालकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
तालुका | एकूण आवश्यकता | कार्यरत | प्रलंबित |
मिरज | २५ | २४ | १ |
कवठेमहांकाळ | १४ | ११ | ३ |
जत | ३२ | २३ | ९ |
आटपाडी | १२ | ८ | ४ |
खानापूर | १४ | १० | ४ |
तासगाव | १९ | १७ | २ |
वाळवा | ३० | २४ | ६ |
शिराळा | २६ | २० | ६ |
पलूस | ११ | ७ | ४ |
कडेगाव | १२ | ९ | ३ |
- 1 of 286
- ››