agriculture news in marathi, lack of graders extents procurement of tur in parbhani and hingoli district | Agrowon

परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात ग्रेडर नसल्याने तूर खरेदी रखडली
टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील हमीभाव खरेदी केंद्रावर नियुक्त करण्यात आलेले ग्रेडर रुजू न झाल्यामुळे ११ केंद्रांवर अद्याप तूर खरेदी सुरू झालेली नाही. हमीभावाने तूर विक्रीसाठी तीन जिल्ह्यांतील १७ हजार ३९६ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली असून, केंद्र सुरू न झालेल्या भागातील शेतकरी खरेदी केंद्रावर तूर घेऊन येण्याच्या संदेशाची वाट पाहात आहेत. दरम्यान, सोमवारपर्यंत (ता.५) नांदेड जिल्ह्यात ५२५ क्विंटल ,तर सेनगाव (जि. हिंगोली) येथे २२० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.

परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील हमीभाव खरेदी केंद्रावर नियुक्त करण्यात आलेले ग्रेडर रुजू न झाल्यामुळे ११ केंद्रांवर अद्याप तूर खरेदी सुरू झालेली नाही. हमीभावाने तूर विक्रीसाठी तीन जिल्ह्यांतील १७ हजार ३९६ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली असून, केंद्र सुरू न झालेल्या भागातील शेतकरी खरेदी केंद्रावर तूर घेऊन येण्याच्या संदेशाची वाट पाहात आहेत. दरम्यान, सोमवारपर्यंत (ता.५) नांदेड जिल्ह्यात ५२५ क्विंटल ,तर सेनगाव (जि. हिंगोली) येथे २२० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत आधारभूत किंमत दराने नांदेड जिल्ह्यात नांदेड (अर्धापूर), हादगाव, किनवट, भोकर, नायगाव, बिलोली, देगलूर, मुखेड, लोहा या नऊ ठिकाणी नाफेडच्या तूर खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली. परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, गंगाखेड, पूर्णा, बोरी या सहा ठिकाणी नाफेडतर्फे, तर मानवत येथे विदर्भ कोसआॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे तूर खरेदी केली जाणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, जवळा बाजार या पाच ठिकाणी नाफेडतर्फे तूर खरेदी केली जाणार आहे.

या ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्याबाबतचे आदेश जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयाकडून संबंधित एजन्सींना देण्यात आले आहेत. या केंद्रावर नाफेडतर्फे ग्रेडरच्या नियुक्त्यादेखील करण्यात आल्या आहेत, परंतु आजवर ग्रेडर रुजू न झाल्यामुळे परभणी जिल्ह्यातील खरेदी केंद्रे सुरू झाला नाहीत. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील केंद्र सुरू झाले असून तेथे सोमवारपर्यंत (ता.५) २१ शेतकऱ्यांची २२० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. अन्य ठिकाणी अद्याप खरेदीस सुरवात नाही, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.
 

इतर ताज्या घडामोडी
मत्स्यपालनामध्ये योग्य तांत्रिक बदलांची...सध्याच्या मत्स्यपालन पद्धतीमध्ये कोणतेही बदल न...
जळगाव बुरशीयुक्त शेवयांच्या प्रकरणात...जळगाव ः शालेय पोषण आहार वाटपानंतर अंगणवाडीमधील...
सातगाव पठार परिसरात बटाटा लागवडीस सुरवातसातगाव पठार, जि. पुणे : काही गावांमध्ये पावसाने...
सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह...सांगोला/करमाळा : जिल्ह्याच्या काही भागांत...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात...पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी...
मातीचा प्रत्येक कण सोन्यासारखा; तो वाया...नाशिक : शेतातील माती म्हणजे कोट्यवधी सूक्ष्म...
नांदेड जिल्ह्यात १ लाख ६५ हेक्टरवर पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप...
शेतकऱ्यांना पीककर्ज देणे टाळले तर ठेवी...नगर  ः शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगामासाठी...
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायमसातारा  ः जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, माण,...
नांदेड जिल्ह्यात फक्त ८.२९ टक्के...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील यंदा खरीप पीककर्ज...
तापीच्या पाण्यास गुजरातचा नकारमुंबई  ः पार-तापी नर्मदा नद्याजोड...
कापूस पीक नियोजनातून हमखास उत्पादन वाढसोनगीर, जि. धुळे ः कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी...
औरंगाबाद जिल्ह्यात अखेर पाऊस बरसलाऔरंगाबाद  : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या...
`दमणगंगा नदीजोड योजनेचे फेरसर्व्हेक्षण...नाशिक : दमणगंगा (एकदरे) नदीजोड योजनेचे...
मराठवाड्यात साडेतीन लाख हेक्‍टरवर पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ३ लाख ६७...
पीककर्जासाठी बँक अधिकाऱ्याने केली...दाताळा, जि. बुलडाणा : पीककर्ज मंजूर करून...
माॅन्सून सक्रिय, सर्वत्र चांगल्या...महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी झालेले असून १००४...
‘एसआरआय’पद्धतीने भात लागवडीचे तंत्रएसआरआय पद्धतीने भात लागवड केल्यामुळे रोपे, माती,...
भूमिगत निचरा प्रणालीद्वारे जमिनींची...पाणी व रासायनिक खते यांच्या अनियंत्रित वापरामुळे...
लागवड सावा पिकाची...जून महिन्यात सावा पिकाची पेरणी करावी. दोन ओळीतील...