खानदेशात पावसाच्या हलक्या सरी

खानदेशात पावसाच्या हलक्या सरी
खानदेशात पावसाच्या हलक्या सरी

जळगाव : खानदेशात धुळे व जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी कमी-अधिक पाऊस बुधवारी (ता. ४) सायंकाळी व मध्यरात्री झाला आहे. गुरुवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंत खानदेशातील धुळे, शिंदखेडा, शिरपूर, चोपडा, जळगाव, धरणगाव, पाचोरा, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव येथे पाऊस झाल्याचे प्रशासनाने जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. पाऊस येईल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी चांगली उगवण झालेल्या मूग, उडदाच्या क्षेत्रात आंतरमशागत केली. तसेच पूर्वहंगामी कापसाच्या पिकातही आंतरमशागतीचे काम सुरू होते. परंतु सकाळी कुठेही पाऊस सक्रिय नव्हता. जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम होती. हलक्‍या व मध्यम स्वरूपाचा पाऊस धुळ्याचा पूर्व भाग आणि जळगाव जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात झाल्याने त्याचा काहीसा लाभ पिकांना झाला आहे. जळगाव व चोपडा तालुक्‍यात सोयाबीनचे क्षेत्र मोडण्याची वेळ आल्याने नव्याने पेरणीसाठी पेरणीलायक किंवा किमान ४० ते ४५ मिलीमीटर पावसाची गरज आहे. दुबार पेरणीसाठी अधिकचा खर्च जळगाव व चोपडा तालुक्‍यात सोयाबीन मोडण्याची वेळ आलेल्या शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची तयारी केली आहे. परंतु त्यांना खर्च अधिक लागणार आहे. एकरी सुमारे एक हजार रुपये खर्च पुन्हा सोयाबीन पेरणीला लागेल. तसेच मजुरीचा खर्च वेगळा असणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com