agriculture news in marathi, Lack of rain losses in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान
टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

नाशिक : नाशिक जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून विविध ठिकाणी झालेल्या परतीच्या पावसाचा फटका शेतीपिकांना बसला. शिवाय वीज पडून दोन जण ठार, तर दोन जण जखमी झाले. या नुकसानीची माहिती संकलित करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे.

नाशिक : नाशिक जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून विविध ठिकाणी झालेल्या परतीच्या पावसाचा फटका शेतीपिकांना बसला. शिवाय वीज पडून दोन जण ठार, तर दोन जण जखमी झाले. या नुकसानीची माहिती संकलित करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे.

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर परतीच्या पावसाने सोमवारी (ता.१) व मंगळवारी (ता.२) असे सलग दोन दिवस शहरासह जिल्ह्याच्या काही भागात दमदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने काही ठिकाणी झाडांच्या फांद्याही तुटून पडल्या. चांदवड तालुक्यातील देवरगाव, जोपूळ परिसराला गारपीटीने तडाखा दिला. यात काही घरांचे पत्रे उडाले, पोल्ट्री फार्मचे नुकसान झाले. पेठ तालुक्यातही गारांचा पाउस झाला.

दत्तु सुकदेव बोरसे (रा. उत्तमनगर, सिडको) यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते देवरगाव येथील रोहीले फाट्यानजिक आंब्याच्या झाडाजवळ पावसापासून बचावासाठी उभे होते. तेव्हा त्यांच्या अंगावर वीज कोसळली. प्रकाश गंगाधर देशपांडे (रा. कामटवाडे) हे जखमी झाले. त्यांच्यावर खजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कचरु सुका वाडगावकर (वय ४०, रा. गोधड्याचा पाडा, ता. त्रंबकेश्वर) यांच्या अंगावर बुधवार (दि. ३) सायंकाळी वीज पडून जखमी झाले. त्यांच्यावर त्रंबकेश्वर येथील शासकीय रुग्णालयात उपाचार सुरू आहेत. पेठ तालुक्यातही वीज पडल्याने नीलेश बाळू वार्डे ( वय ३३) गंभीर जखमी झाले. नाशिक येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला दूरध्वनीवरून कळविण्यात आली. त्यांच्या मृत्यूची नोंद अद्याप लेखी स्वरूपात जिल्हाप्रशासनाला प्राप्त झालेली नाही.

वांगणी गावातील गंगाराम जाणू प्रधान, रामा जाधव, यशवंत चिमणा प्रधान यांच्या घरांचेही पावसामुळे नुकसान झाले. त्याचे प्राथमिक पंचनामे करण्यात आले असून त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने मदतीसाठी पाठवला आहे.

इतर ताज्या घडामोडी
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
लागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...
सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून...पुणे : शेतकऱ्यांना दिवसा व सौरऊर्जेद्वारे शाश्वत...
अपारंपरिक ऊर्जा काळाची गरज : बावनकुळेभंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन...
नांदेड जिल्ह्यामध्ये १८ टॅंकरद्वारे...नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११...
परभणी, नांदेड जिल्ह्यात २ लाख खात्यांवर...परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे...
टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे २२...सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका...
पाणीटंचाईमुळे कांदा लागवडीच्या...पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती...
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १२ कोटी...कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास...
कचारगडला `अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा...गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे...