दोन एकरातील मका पिकावर चालवला रोटाव्हेटर

दोन एकरातील मका पिकावर चालवला रोटाव्हेटर
दोन एकरातील मका पिकावर चालवला रोटाव्हेटर

भराडी : बोरगाव बाजार (ता. सिल्लोड) परिसरात गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून पावसाने दांडी मारल्यामुळे पिके सुकू लागली आहेत. रविवारी (ता. 12) गावातील गणेश महेर या शेतकऱ्यांनी दोन एकरावर उभ्या असलेल्या मकाच्या पिकावर रोटोव्हेटर चालवित हे पिक काढून टाकले.  तालुक्‍यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे हाता तोंडांशी आलेले पिके वाळू लागली आहेत. बोरगाव परिसरातील सोनाअप्पावाडी येथील शेतकरी गणेश महेर यांनी दोन एकरात मकाचे पिक घेतले होते. यासाठी महागडे बि-बियाणे, खतांचा वापर केला, पेरणी, निंदणी खुरपणीवर करून त्यांनी हे पिक जगवले होते. मात्र पंचवीस दिवसापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे हे मकाचे पिक पुर्णता वाळून गेले. यामुळे नाईलाजास्तव महेर यांनी या उभ्या पिकावर रोटाव्हेटर चालवावा लागला. 

गेल्या वर्षी बोंड आळीने मारले. यामुळे यंदा मकाचे पिक घेतले यातून काहीचा दिलासा मिळेल असे वाटले होते. मात्र पावसाअभावी हे पिकही हातचे गेले. यासह पिकासाठी बियाणे, रासायनिक खते, पेरणी, निंदणी साठी झालेला खर्च व पुढे जनावरांच्या चाऱ्याची व पाण्याची टंचाईमुळे बैलजोडी विकायची वेळ आली आहे.  - गणेश कचरु महेर, शेतकरी 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com