agriculture news in marathi, lack of rain stops Brinjal plantaion in Jalgaon District | Agrowon

जळगाव जिल्ह्यात वांग्याची लागवड रखडली
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 जुलै 2018

जळगाव : यंदा जोरदार पावसाअभावी या वांग्याची लागवड रखडल्याने जळगाव जिल्ह्याची विशेष ओळख असलेल्या भरीताच्या वांग्यांचा हंगाम यंदा उशिरा येण्याची शक्यता आहे. वाफ्यांमध्ये रोपे तयार झाली आहेत. परंतु त्यांची लागवड करण्यासाठी जोरदार पावसाची आवश्यकता आहे.

जळगाव : यंदा जोरदार पावसाअभावी या वांग्याची लागवड रखडल्याने जळगाव जिल्ह्याची विशेष ओळख असलेल्या भरीताच्या वांग्यांचा हंगाम यंदा उशिरा येण्याची शक्यता आहे. वाफ्यांमध्ये रोपे तयार झाली आहेत. परंतु त्यांची लागवड करण्यासाठी जोरदार पावसाची आवश्यकता आहे.

जिल्ह्यात रावेर, यावल, जळगाव, भुसावळ व मुक्ताईनगर या तालुक्‍यांमध्ये भरीताच्या वांग्याची लागवड केली जाते. क्षेत्र सुमारे ७०० ते ८०० हेक्‍टर असते. यावलमधील भालोद, पाडळसे, बामणोद, पिळोदा, सांगवी बुद्रुक, आमोदे बुद्रुक, न्हावी प्र.यावल येथे,  रावेरातील मस्कावद, वाघोदा भागात, मुक्ताईनगरमधील तापीकाठावरील गावांमध्ये, भुसावळात तळवेल, पिंप्रीसेकम, वरणगाव परिसरात आणि जळगाव तालुक्‍यात आसोदे, भादली बुद्रुक, विदगाव, तुरखेडा, कानळदा या भागात लागवड केली जाते.  

लागवडीसाठीची रोपे मे महिन्याच्या अखेरीस वाफ्यांमध्ये शेतकऱ्यांनी पेरली. त्यासाठी घरी जतन केलेल्या बियाण्याचाच वापर परंपरेनुसार केला आहे. जुलैच्या सुरवातीला लागवडीचा प्रघात आहे. दिवाळीला भरताची वांगी उपलब्ध व्हावीत, असे नियोजन असते. मध्यंतरी पाऊस आल्यानंतर लागलीच सऱ्या पाडण्याचे काम वांगी उत्पादकांनी केले. 

वांगी लागवडीसाठी भिज पावसाचे वातावरण अनुकूल असते. हलका पाऊस आणि उन्हामुळे शेतकरी वांग्याची लागवड टाळत आहेत. रोपे अशा वातावरणात तग धरत नाहीत. कृत्रिम स्रोतांमधून सिंचनाची सुविधा शेतकऱ्यांकडे आहे, परंतु त्यावर रोपे फारशी जोमात वाढत नाही. पावसाचे पाणी अतिशय गुणकारक असते, एकही रोप मरत नाही, असे शेतकरी मानतात. अनेक शेतकरी रोपे बामणोद, भालोद, पिळोदा भागातून विकत आणतात. तेथे एक एकरसाठी आवश्‍यक रोपांसंबंधी सुमारे १८०० ते २००० रुपये मोजावे लागतात. 

इतर अॅग्रो विशेष
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...