राज्यात भेंडी प्रतिक्विंटल १००० ते ४००० रुपये

भेंडी
भेंडी

परभणीत २५०० ते ३००० रुपये परभणी : येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. २२) भेंडीची ८ क्विंटल आवक झाली असताना प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या येथील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक परिसरातील सिंगणापूर, बोरवंड, तसेच पूर्णा तालुक्यांतून भेंडीची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी ७ ते १५ क्विंटल भेंडीची आवक झाली असताना, प्रतिक्विंटल सरासरी २००० ते ३५०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २२) भेंडीची ८ क्विंटल आवक झाली असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये होते, तर किरकोळ विक्री प्रतिकिलो ४० ते ६० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले. जळगावात १२०० ते २२०० रुपये जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २२) भेंडीला १२०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. आवक १५ क्विंटल एवढी झाली. बाजारात भेंडीची आवक एरंडोल, धरणगाव, पाचोरा, जळगाव, जामनेर आदी भागांतून होते. आवक स्थिर आहे. दरही स्थिर आहे. महिनाभरात भेंडीला सरासरी दर १७०० रुपये प्रतिक्विंटल एवढा मिळाला आहे. सध्या रब्बी किंवा हिवाळ्यातील भेंडीचे पीक अंतिम टप्प्यात आहे. तर काही भागांतून आगाप लागवडीच्या उन्हाळ भेंडीचे तोडे सुरू झाले आहे. आवक बरी आहे. त्यामुळे घाऊक बाजारातील दरही स्थिर असून, शेतकऱ्यांना फारसा फटका महिनाभरात भेंडीच्या पिकात बसलेला नसल्याचे सांगण्यात आले.  औरंगाबादेत १००० ते १५०० रुपये औरंगाबाद: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २२) भेंडीची ५४ क्‍विंटल आवक झाली. या भेंडीला १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. फेब्रुवारीच्या सुरवातीला तीन हजारावर असलेल्या भेंडीच्या दरात आता घसरण पाहायला मिळते आहे. ५ फेब्रुवारीला १२ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीला ३००० ते ३२०० रुपये दर मिळाला. १४ फेब्रुवारीला ३४ क्‍विंटल आवक होऊन दर १००० ते २५०० रुपये राहिले. १५ फेब्रुवारीला ३१ क्‍विंटल आवक होऊन १५०० ते २५०० रुपये दर मिळाला. १७ फेब्रुवारीला भेंडीची आवक ६३ क्‍विंटल, तर दर १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २० फेब्रुवारीला ४९ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीला १२०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २१ फेब्रुवारीला ४९ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीचे दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. नगरला १००० ते २५०० रुपये नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. २२) भेंडीची २२ क्‍विंटल आवक झाली. या भेंडीला १००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. नगर बाजार समितीत गत सप्ताहाच्या तुलनेत बाजार समितीत भेंडीची आवक काहीशी वाढली आहे, असे माहिती बाजार समितीतून सांगण्यात आले. नगर बाजार समितीत नगरसह शेजारच्या जिल्ह्यांतूनही भेंडीची आवक होते. १ फेब्रुवारीला बाजार समितीत १६ क्विंटलची आवक झाली, तर १८०० ते ३००० रुपये दर मिळाला. ८ फेब्रुवारीला आवक २० क्विंटल होऊन १५०० ते ३००० रुपये दर मिळाला. १५ फेब्रुवारीला आवक आठ क्विंटलची आवक होऊन १५०० ते २५०० रुपये दर मिळाला. सोलापुरात १५०० ते ३५०० रुपये  सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात भेंडीच्या आवकेत वाढ झाली. आवक वाढली, तरी मागणी कायम असल्याने भेंडीच्या दरात तेजी टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. भेंडीला प्रतिक्विंटल १५०० ते ३५०० व सरासरी ३००० रुपये दर मिळाला. बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात भेंडीची आवक रोज एक ते दोन टनापर्यंत राहिली. पण गेल्या काही दिवसांत त्यात लक्षणीय वाढ झाली. पण दरावर त्याचा फारसा परिणाम झाला नाही, दरातील तेजी टिकून होती. भेंडीची सगळी आवक स्थानिक भागातूनच झाली. गेल्या महिनाभराचा विचार करता ३१ जानेवारीला ९०२ किलोपर्यंत आवक होऊन दहा किलोस १०० ते ३७५ व सरासरी २८० रुपये दर मिळाला. ७ जानेवारीला ९४८ किलो आवक तर दर ८० ते १७५ रुपये मिळाला. १४ फेब्रुवारीला ३२०१ किलोपर्यंत आवक होऊन १४० ते ३६० व सरासरी २५० रुपये दर मिळाला. २१ फेब्रुवारीला २४५५ किलो आवक तर दर १५० ते ३५० व सरासरी ३०० रुपये मिळाला. अकोल्यात १५०० ते २००० रुपये अकोला : सध्या विकत अाहे. दररोज अाठ ते दहा क्विंटल भेंडीची अावक होत अाहे. नव्याने लागवड झालेल्या भेंडीची अावक सुरू झाली अाहे.  अकोला जिल्ह्यासह लगतच्या भागातून भेंडी विक्रीसाठी येत अाहे. प्रामुख्याने नवीन भेंडी ही अाकाराने लहान असल्याने चांगला दर मिळत अाहे. चांगल्या दर्जाच्या भेंडीला क्विंटलला २५०० पर्यंतसुद्धा भाव मिळत अाहे. तर कमी दर्जाची भेंडी साधारणतः १५०० ते १८०० दरम्यान विकत अाहे. गेल्या पंधरा दिवसांपासून भेंडीचे दर स्थिरावले असून, अागामी काळात त्यात वाढीची शक्यता व्यापारी सूत्रांनी व्यक्त केली. किरकोळ बाजारात भेंडीची ३५ ते ४० रुपये किलो दराने ग्राहकांना सर्रास विक्री होत अाहे. पुण्यात १००० ते ३५०० रुपये पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २२) भेंडीची सुमारे पाच टेंपाे आवक झाली हाेती. या वेळी प्रतिक्विटंलला १००० ते ३५०० रुपये दर हाेता. सध्याचे दर सरासरी असल्याचे आडत्यांनी सांगितले. पुणे बाजार समितीमध्ये पुणे विभागातील विविध जिल्ह्यांमधून भेंडीची आवक हाेत असून, राेज सराससरी पाच ते सहा टेंपाे आवक हाेत आहे. २२ तारखेला २२० क्विंटल आवक होऊन, १००० ते ३००० रुपये दर मिळाला. २१ तारखेला १८० क्विंटल आवक होऊन १००० ते ३००० रुपये दर मिळाला. २० तारखेला १८५ क्विंटल आवक, तर दर १००० ते ३००० रुपये होते. १९ तारखेला आवक १९० होऊन १००० ते ३००० रुपये दर मिळाला. १८ क्विंटल आवक १७९ क्विंटल झाली होती, तर दर १५०० ते ३००० रुपये मिळाला. नागपुरात ३००० ते ३५०० रुपये  नागपूर ः नागपूरच्या कळमणा बाजारात भेंडीची आवक स्थिर असून, अपवाद वगळता दरही स्थिर असल्याचे चित्र आहे. कळमणा बाजारात भेंडीची सरासरी आवक १५० क्‍विंटलच्या घरात आहे. फेब्रुवारीच्या सुरवातीला बाजारात भेंडीचे दर ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल होते. ११ फेब्रुवारीला हे दर २८०० ते ३३०० रुपये क्‍विंटलवर पोचले. १२ फेब्रुवारीला पुन्हा दरात घसरण होत ते २५०० ते ३००० रुपये क्‍विंटलवर पोचले. १३ फेब्रुवारीला २००० ते २५०० रुपयांपर्यंत ते खाली आले. १५ फेब्रुवारीपासून भेंडीच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरवात झाली. २००० ते २८००० रुपये प्रतिक्‍विंटलवर ते पोचले. १८ फेब्रुवारीला २१०० ते ३००० रुपये, १९ फेब्रुवारीला २५०० ते ३०००, तर २० फेब्रुवारीला ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल असे भेंडीचे दर होते. कोल्हापुरात १००० ते ३४०० रुपये कोल्हापूर: येथील बाजार समितीत भेंडीची दररोज २०० ते ३०० पोती आवक होत आहे. भेंडीस प्रतिक्विंटल १००० ते ३४०० रुपये दर मिळत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून भेंडीचे दर स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. बाजार समितीत बेळगाव भागातून भेंडीची आवक होते. मध्यतरी ढगाळ हवामामुळे भेंडीच्या आवकेत घट झाली होती. गेल्या चार दिवसांपासून भेंडीच्या आवकेत चांगली वाढ होत आहे. २१ तारखेला २३१ करंड्या आवक झाली होती. तिला दहा किलोस १०० ते ३४० रुपये दर मिळाला. १४ तारखेला १८५ करंड्या आवक होऊन दहा किलोस ८० ते २५० रुपये दर मिळाला. ७ तारखेला १४० करंड्या आवक झाली होती, तीस दहा किलोस १२० ते ३७० रुपये दर मिळाला. सांगलीत ३००० ते ४००० रुपये सांगली ः येथील शिवाजी मंडईत भेंडीची आवक कमी अधिक आहे. गुरुवारी (ता. २२) भेंडीची ७०० ते ८०० किलोंची आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोस ३०० ते ४०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. येथील शिवाजी मंडईत भेंडीची आवक सांगली जिल्ह्यातील विविध भागातून हाेते आहे. गेल्या सप्ताहापासून भेंडीची आवक कमी अधिक आहे. भेंडीचे दरही स्थिर आहेत, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. १५ फेब्रुवारीला बाजारात ७०० किलो आवक झाली होती, यावेळी तीस ३००० ते ४००० रुपये दर मिळाला. ८ फेब्रुवारीला ६०० क्विंटल आवक झाली होती, तीस प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये दर मिळाला. २ फेब्रुवारीला ८०० आवक होऊन तीस ३००० ते ४००० रुपये दर मिळाला, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com