परभणी भेंडी प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये

भेंडी
भेंडी

परभणी : येथील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १६) भेंडीची ५ क्विंटल आवक असताना २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. शेंगवर्गीय भाज्यांमध्ये वालाची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. गवारची ४ क्विंटल आवक असताना ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४०० ते ६०० रुपये दर मिळाले पालेभाज्यामध्ये पालकाची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ३०० ते ५०० रुपये दर मिळाले. चुक्याची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दर मिळाले. मेथीच्या ३० हजार जुड्यांची आवक असताना प्रतिशेकडा १०० ते १५० रुपये दर मिळाले. कोथिंबीरची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये दर मिळाले. वांग्याची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३०० ते ६०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ७०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २५० ते ५०० रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची २५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये दर मिळाले.  ढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. फ्लाॅवरची २५ क्विंटल आवक झाली असताना प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये दर मिळाले. कोबीची २५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४०० ते ६०० रुपये दर मिळाले. दोडक्याची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. गाजराची ६० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ३०० ते ५०० रुपये दर मिळाले. बीट रूटची ३ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दर मिळाले. लिंबाची २१ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com