नाशिकला भेंडी, घेवडा, ढोबळी मिरची तेजीत

भेंडी, घेवडा, ढोबळी मिरची
भेंडी, घेवडा, ढोबळी मिरची

नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात भेंडी, घेवडा, ढोबळी मिरची या फळभाज्यांना तेजीचे दर मिळाले. कांद्याची आवक स्थिर असून, मागील महिन्यापासून प्रतिक्विंटलला १८०० ते ३५०० व सरासरी ३१०० रुपये या दरावर कांदा स्थिरावला आहे. याखेरीज भेंडी, हिरवी मिरची या भाज्यांनाही स्थानिक, तसेच जिल्ह्याबाहेरील बाजारातून होणारी मागणी कायम असल्याचेच चित्र दिसून आले. कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, चांदवड, सिन्नर या भागातील अर्ली हंगामातील द्राक्षांची आवक सुरू असून या द्राक्षांना दिल्लीच्या बाजारात प्रतिकिलोला ५० ते १०० रुपये दर गतसप्ताहातही कायम राहिले. नाशिक जिल्ह्यात गतसप्ताहात सकाळचे किमान तापमान ५ ते ७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिले. या स्थितीत बाजारातील फळभाज्यांची आवक घटली. परिणामी, स्थानिक तसेच जिल्ह्याबाहेरील बाजारपेठेतून मागणी वाढली. वांग्याला हिवाळ्यात मागणी वाढते. गतसप्ताहात वांग्याची दिवसाला सरासरी १२० क्विंटलची आवक झाली. वांग्याला प्रतिक्विंटलला २५०० ते ३५०० व सरासरी ३२०० रुपये दर राहिले. घेवडा व हिरवी मिरचीची आवक अत्यल्प झाली. घेवड्याची आवक २६२ क्विंटल झाली. घेवड्याला प्रतिक्विंटलला २००० ते २८०० व सरासरी २५०० दर मिळाले. हिरव्या मिरचीची आवक, तर घेवड्याहून कमी म्हणजे अवघी ८ क्विंटलच्या आसपास होती. हिरव्या मिरचीला क्विंटलला २५०० ते ४१०० व सरासरी ३५०० असे दर मिळाले.  ढोबळी मिरचीची आवक जास्त असून, मागणी असल्याने दरही चांगले मिळत आहे. गतसप्ताहात ढोबळीची १०० ते १२० क्विंटलची आवक होती. या मिरचीला २५०० ते ४३०० व सरासरी ३३०० असे तेजीचे दर मिळाले. या वेळी भेंडीची आवक ४५ क्विंटल होती. भेंडीचे दर प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० व सरासरी ३००० असे होते.  द्राक्ष बाजार स्थिर  नाशिक जिल्ह्यातील अर्ली द्राक्षांचा हंगाम सुरू झाला आहे. नाशिक भागात आता सिन्नर व चांदवड भागातील द्राक्षांचे खुडे सुरू झाले आहेत. हा माल रशियाला निर्यात होतो. यातील बहुतांश द्राक्ष माल दिल्लीच्या बाजारात पाठविला जातो. गतसप्ताहात देशांतर्गत बाजारात द्राक्षांना ५० ते ७० व सरासरी ६० रुपये दर मिळाले. या वेळी निर्यातक्षम द्राक्षांना ६० ते १०० व सरासरी ८० रुपये दर मिळाले. नाशिक भागातील कांद्याची मागणी टिकून आहे. गतसप्ताहात कांद्याला प्रतिक्विंटलला १८०० ते ३५०० व सरासरी ३१०० रुपये दर मिळाले. येत्या सप्ताहात हे दर टिकून राहतील, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com