agriculture news in marathi, ladies finger gets 500 to 3000 rupees per quintal in state apmcs | Agrowon

राज्यात भेंडी ५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

सांगलीत दहा किलोस २५० ते ३०० रुपये 
सांगली : येथील शिवाजी मंडईत भेंडीची आवक कमी अधिक प्रमाणात होते. गुरुवारी (ता. १६) भेंडीची ३० ते ४० बॉक्सची (एक बॉक्स ३० किलो) आवक झाली असून, त्यास प्रतिदहा किलोस २५० ते ३०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सांगलीत दहा किलोस २५० ते ३०० रुपये 
सांगली : येथील शिवाजी मंडईत भेंडीची आवक कमी अधिक प्रमाणात होते. गुरुवारी (ता. १६) भेंडीची ३० ते ४० बॉक्सची (एक बॉक्स ३० किलो) आवक झाली असून, त्यास प्रतिदहा किलोस २५० ते ३०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
मंडईत गत सप्ताहात भेंडीची आवक ५० ते ६० बॉक्स आवक होती. चालू सप्ताहात भेंडीची आवकीत घट झाली आहे. मात्र दर स्थिर आहेत, असे व्यापारी वर्गाने सांगितले. मंडईत वाळवा, मिरज, पलुस तालुक्यांतून भेंडीची आवक होते. बुधवारी (ता. १५) भेंडीची ३० ते ४० बॉक्सची आवक झाली होती. त्यास प्रतिदहा किलोस २०० ते २५० रुपये असा दर मिळाला. मंगळवारी (ता. १४) भेंडीची ४० ते ५० बॉक्सची आवक झाली होती. त्यास प्रति दहा किलोस २५० ते ३०० रुपये असा दर मिळाला. पुढील सप्ताहात भेंडीच्या आवकेत वाढ होण्याची शक्यता आहे. भेंडीची आवक जरी वाढली तरी दर स्थिर राहतील.

पुण्यात दहा किलाेला १०० ते २५० रुपये 
पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १६) भेंडीची सुमारे १५ टेंपाे आवक झाली हाेती. १५ आॅगस्टला बाजार समिती बंद असल्याने गुरुवारी (ता. १६) बहुतांश शेतमालाची आवक वाढली हाेती. यामध्ये भेंडीचा देखील समावेश हाेता. या वेळी दहा किलाेला १०० ते २५० रुपये एवढा दर हाेता. बाजार समितीमध्ये भेंडीची आवक प्रामुख्याने पुणे विभागातील विविध जिल्‍ह्यांमधून हाेत आहे. सरासरीच्या तुलनेत आवक वाढली असून, दर देखील सरासरीच्या २०० ते ३०० रुपयांपेक्षा कमी झाला आहे, अशी माहिती ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी दिली.

नाशिकला प्रतिक्विंटल १२०० ते ३००० रुपये
नाशिक : नाशिक बाजार समितीत गुरुवारी (ता. १६) भेंडीची १०३ क्विंटल आवक झाली. या वेळी भेंडीला प्रतिक्विंटलला १२०० ते ३००० व सरासरी २२०० रुपये दर मिळाले. मागील पंधरवड्यात भेंडीची सरासरी आवक ५५ क्विंटल होती. त्या तुलनेत सद्यस्थितीत भेंडीची आवक दुपटीने वाढली आहे. नाशिक बाजार समितीत इगतपुरी, दिंडोरी तालुक्यांतून भेंडीची आवक होते. ही आवक २० किलो वजनाच्या क्रेटमधून होते. गुरुवारी (ता. १६) एकूण ८५५ क्रेटची आवक झाली. प्रतिक्रेटला १५० ते ३५० व सरासरी २५० रुपये दर मिळाले. येत्या काळात भेंडीची आवक अजून वाढेल व दर स्थिर राहतील, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

औरंगाबादेत भेंडी ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल
औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १६) भेंडीची ३५ क्‍विंटल आवक झाली. या भेंडीला ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. औरंगाबाद बाजार समितीमध्ये २ जुलैला ७० क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीचे दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १० जुलैला ५४ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीला १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाले. १६ जुलैला २८ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीचे दर १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २४ जुलैला ३२ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीचे दर १००० ते १७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २८ जुलैला ३७ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीला २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३० जुलैला ५२ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीला २२०० ते २८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १ ऑगस्टला २० क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीचे दर १८०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ९ ऑगस्टला ३१ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीला १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. तर १४ ऑगस्टला ४३ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीचे दर ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

साताऱ्यात प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपये
सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती गुरुवारी (ता. १६) भेंडीची २७ क्विंटल झाली. भेंडीस प्रतिक्विंटल १००० ते २००० असा दर मिळाला आहे. भेंडीच्या आवकेत वाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. फलटण कोरेगाव, खटाव, सातारा या तालुक्यांतून भेंडीची आवक होत आहे. मंगळवारी (ता. १४) भेंडीची ३६ क्विंटल आवक होऊन भेंडीस क्विंटलला १००० ते १५०० असा दर मिळाला आहे. मंगळवारी (ता. ७) भेंडीची १० क्विंटल आवक होऊन भेंडीस क्विंटलला १५०० ते २००० असा दर मिळाला होता. ३१ जुलैला भेंडीची १८ क्विंटल आवक होऊन क्विंटलला २००० ते ३००० असा दर मिळाला होता. भेंडीची ३० ते ४० रुपये प्रतिकिलोप्रमाणे किरकोळ विक्री केली जात आहे.

कोल्हापुरात प्रति दहा किलोस ५० ते ३०० रुपये दर
कोल्हापूर : येथील बाजार समितीत भेंडीस दहा किलोस ५० ते ३०० रुपये दर मिळत आहे. गेल्या पंधरवड्यापासून भेंडीचे दर स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. बाजार समितीत कोल्हापूरसह बेळगाव भागातून भेंडीची आवक होते. पावसाचे सातत्य असल्याने अनेक भागांत फळभागांची तोडणी करणे अशक्‍य बनत असल्याने काही प्रमाणात गेल्या चार दिवसांत भेंडीच्या आवकेत कमी-जास्तपणा आहे. अनेक शिवारांमध्ये दलदल झाल्याने भेंडीच्या तोडणीस अडथळे येत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. कधी ढगाळ हवामान, कधी उष्णता यामुळे भेंडीच्या किडीतही वाढ होत असल्याचे शेतकरी सूत्रांनी सांगितले. पंधरवड्यापूर्वी भेंडीची आवक तीनशे करंड्या इतकी होती. आता दोनशे ते अडीचशे करंड्या आवक होत असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.

सोलापुरात प्रतिक्विंटल ३००० रुपये
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात भेंडीला चांगली मागणी राहिली. भेंडीला प्रतिक्विंटल सर्वाधिक ३००० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्राकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात या सप्ताहात भेंडीची आवक रोज २० ते ३० क्विंटलपर्यंत झाली. दर प्रतिक्विंटल किमान ७०० रुपये, सरासरी २००० आणि सर्वाधिक ३००० रुपये असा दर मिळाला. या आधीच्या सप्ताहात हाच दर प्रतिक्विंटल किमान १००० रुपये, सरासरी २५०० आणि सर्वाधिक ३५०० रुपये होता. तर आवक रोज १० ते २० क्विंटलपर्यंत होती. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आवक एकदमच कमी १० ते १५ क्विंटलपर्यंत झाली आणि दर प्रतिक्विंटल किमान १२०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये इतका मिळाला.

इतर ताज्या घडामोडी
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...