भेंडी
भेंडी

राज्यात भेंडी प्रतिक्विंटल १००० ते ४००० रुपये

सोलापुरात प्रतिक्विंटल १००० ते ३००० रुपये सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात भेंडीचे दर चांगलेच वधारले. भेंडीची आवक तुलनेने कमी जास्त होत राहिली. पण मागणी असल्याने दर टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. भेंडीला प्रतिक्विंटल १००० ते ३००० रुपये दर मिळाला. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात भेंडीची आवक रोज किमान २ हजार ते ३ हजार क्विंटलपर्यंत होती. बुधवारी (ता.२५) हीच आवक २९८९ क्विंटलपर्यंत राहिली. तर दर प्रतिदहा किलोसाठी १०० ते ३०० व सरासरी १८० रुपये राहिला. त्या आधीच्या आठवड्यात साधारणपणे २७९० क्विंटल इतकी आवक राहिली आणि दर ५० ते २०० व सरासरी ११० रुपये, तर त्या आधीच्या आठवड्यात आवक तब्बल ७४८९ क्विंटलपर्यंत राहिली. तर दर प्रतिदहाकिलोसाठी ५० ते १८० व सरासरी १२० रुपये आणि ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात हेच दर प्रतिदहा किलोसाठी १३० ते २०० व सरासरी १३० रुपये असा होता. तर त्या आठवड्यातील आवक ५४६९ क्विंटल होती. भेंडीची सगळी आवक स्थानिक भागातूनच झाली. सांगलीत प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये सांगली ः येथील शिवाजी मंडईत भेंडीची २०० ते ३०० करंड्या आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. शिवाजी मंडईत मिरज, कसबे डिग्रज, तूंग, दूधगाव, या भागातून आवक होते. गतसप्ताहात पावसामुळे भेंडीची आवक कमी प्रमाणात होती. चालू सप्ताहात ५० ते १०० करंड्यांनी आवक वाढली आहे. भेंडीची आवक जरी वाढली असली तरी दर मात्र स्थिर आहेत.

बाजार समितीतील आवक व दर (दहा किलो /रुपये ) 

दिनांक     आवक     किमान     कमाल
१६ ऑक्‍टोबर  १५०     २००     २५०
९ ऑक्‍टोबर २००     १५०     २००
२ ऑक्‍टोबर  २००     १५०     २००

जळगावात प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २६) फक्त सात क्विंटल एवढी भेंडीची आवक झाली. तीस १२०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला.  भेंडीची आवक महिनाभरापासून जेमतेम अशीच आहे. आवक कमी असल्याने मागणी अधिक व पुरवठा कमी अशी स्थिती असून, किरकोळ बाजारात दर चढेच आहेत. बाजार समितीत मागील महिनाभरात भेंडीची आवक सरासरी पाच क्विंटल प्रतिदिन अशीच राहिली आहे. रब्बी भेंडी फारशी निघत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात एरंडोल, धरणगाव, जामनेर, यावल आदी तालुक्‍यांमध्ये लागवड अधिक असते. लागवड यंदा फारशी झालेली नाही. जी लागवड झाली ती उशिराने त्यामुळे तोडे हवे तशे निघत नसल्याने आवक कमी आहे. यातच अनेक शेतकरी मुंबई, पुणे येथील मोठ्या खरेदीदारांना भेंडीचा थेट पुरवठा करतात. त्यांची भेंडी बाजार समितीत येत नसल्याने तुटवडा अधिकचा जाणवतो.  बाजार समितीतील आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये)

दिनांक     आवक     किमान     कमाल     सरासरी
२६ ऑक्‍टोबर   ०७     १२००     २०००     १६००
१९ ऑक्‍टोबर  ०३     ८००     १६००     १०००
१२ ऑक्‍टोबर  ०५     ८००     १४००     १०००
५ ऑक्‍टोबर  ०८     १०००     २२००     १६००

अकोल्यात प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये अकोला ः येथील भाजी बाजारात भेंडीची विक्री सध्या २५०० ते ४००० रुपये क्विंटलदरम्यान होत आहे. दररोज सात ते दहा क्विंटल भेंडीची अावक होत अाहे. भेंडीचे दर गेल्या १५ ते २० दिवसांत स्थिरावले असल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. येथील बाजारात भेंडीची विक्री १० किलो (एक मण)प्रमाणे होते. चांगल्या प्रतीची भेंडी सर्रास ३५० ते ४०० रुपये विकत अाहे. हलक्या प्रतीची भेंडी २०० रुपये मण विकत अाहे. सरासरी विचार करता २५० ते ४०० रुपयांदरम्यान एक मणाचा भाव ठरत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भेंडी अधिकाधिक विक्रीला येत अाहे. शिवाय लगतच्या वाशीम, बुलडाणा भागांतूनही भेंडी विक्रीसाठी अाणली जात आहे. भेंडीचे पीतृपक्षात दर वाढले होते. हा पंधरवाडा संपताच दरांमध्ये थोडीफार घसरण झाली. तरीही सध्या चांगल्या प्रतीच्या भेंडीला ३५०० ते ४००० रुपये क्विंटलला भाव मिळत आहे. कोल्हापुरात प्रतिक्विंटल १००० ते ३६०० रुपये​ कोल्हापूर: येथील बाजार समितीत भेंडीस प्रतिक्विंटल १००० ते ३६०० रुपये दर मिळत आहे. बाजार समितीत दररोज ३०० ते ४०० करंड्या आवक होत आहे. पावसामुळे भेंडीच्या आवकेत कमी जास्त पणा असल्याने दर ही स्थिर नसल्याची माहिती बाजारसमितीच्या सूत्रांनी दिली. सध्या ढगाळ हवामान असल्याने भेंडीवरील किडीचे नियंत्रण करणे आव्हानात्मक ठरत असल्याचे भेंडी उत्पादकांनी सांगितले. बाजार समितीतील आवक व दर (प्रतिदहा किलो/रुपये) 

दिनांक     आवक     किमान     कमाल
२५ आॅक्टोबर  ३८०     १००     ३६०
१८ आॅक्टोबर २७०     १५०     ३८०
११ आॅक्टोबर  ३१०     १४०     ३१०

    औरंगाबादेत प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये   औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २६) भेंडीची ३९ क्‍विंटल आवक झाली. तीस २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  औरंगाबाद बाजार समितीमध्ये भेंडीच्या आवक व दरात चढ-उतार सुरू आहेत. २४ ऑक्‍टोबरला ३९ क्‍विंटल आवक होऊन २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २३ ऑक्‍टोबरला २७ क्‍विंटल आवक, तर दर १२०० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा मिळाला. १९ ऑक्‍टोबरला ३८ क्‍विंटल आवक होऊन दर १२०० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.  १२ ऑक्‍टोरला ५३ क्‍विंटल आवक, तर १००० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ५ ऑक्‍टोबरला ३४ क्‍विंटल  आवक होऊन दर १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  ऑक्‍टोबरमधील चार गुरुवारचा आढावा घेता भेंडीचे सरासरी दर ११५० ते २२५० रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.     मुंबईत प्रतिक्विंटल २८०० ते ३२०० रुपये मुंबई: दिवाळी आणि सणासुदीत कृषी उत्पन्न बाजार समितीत भेंडीची आवक घटल्याने भेडींचे दर वधारले आहेत. बुधवारी (ता. २५) भेंडी नं. १ची ४५९ क्विंटल आवक झाली होती, तीस प्रतिक्विंटल २८०० ते ३२०० व सरासरी ३००० रुपये दर मिळाला. भेंडी नं.२ची १८३६ क्विंटल आवक होऊन १५०० ते २५०० व सरासरी २००० रुपये दर मिळाला, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीमध्ये २८ ते ३० रुपये प्रतिकिलो दराने खरेदी होणाऱ्या भेंडीची होलसेल विक्री ४० रुपये प्रतिकिलो असून, ग्राहकांना प्रतिकिलो ६०  रुपयांनी खरेदी करावी लागत असल्याचे आजचे चित्र आहे, असे स्थानिक व्यापारी सोमनाथ पवळे यांनी सांगितले. सणासुदीमुळे भेंडी आवक घटली असून, दरही वाढले आहेत. पुढील काही दिवसांत भेंडी दर आणि आवक स्थिर राहील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.  बाजार समितीतील आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये)

दिनांक     भेंडी     आवक     किमान     कमाल     सरासरी 
१७ ऑक्टोबर   भेंडी नं.१ ३२५     ३०००     ३६००     ३३००
  भेंडी नं.२  १३००     ३०००     ३६००     ३३००    
१२ ऑक्टोबर    भेंडी नं.१  २८४     २६००     ३०००     २८००
   भेंडी नं.२  ११३५     १५००     २०००     १८०० 
५ ऑक्टोबर     भेंडी नं.१ ४६७     ३०००     ३४००     ३२००
      भेंडी नं.२   १८६८     २६००     ३०००     २८००

          नागपुरात प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये नागपूर ः नागपूरच्या बाजारात भेंडीच्या घाऊक दरात सरासरी ५०० रुपयांची वाढ झाली आहे. महिन्याच्या सुरवातीला १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल भेंडीचा दर होता. त्यात टप्प्याटप्प्याने वाढ होत २००० ते २५०० रुपयांपर्यंत दर पोचले आहेत. नागपूरलगतच्या गावांमध्ये भाजीपाल्याचे उत्पादन होते. त्यासोबतच अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांतूनदेखील भेंडीची आवक येथे सातत्याने होते. महिन्याच्या सुरवातीला भेंडीचे दर १००० ते १५०० रुपये क्‍विंटल होते. आवक १४० क्‍विंटलची सरासरी होती. आवक १३० ते १५० क्‍विंटल अशी स्थिर असली, तरी दरात काही अंशी तेजीचा अनुभव शेतकरी घेत आहेत. १७ ऑक्‍टोबरपासून दर १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल झाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे दर २००० ते २५०० रुपये क्‍विंटलवर पोचले आहेत. २५ ऑक्‍टोबर रोजी भेंडी २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलने विकली गेली. किरकोळ बाजारात भेंडी २० रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे. परभणीत प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये परभणी:  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. २६) भेंडीची १० क्विंटल आवक होती. भेंडीला १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या स्थानिक परिसरातून भेंडीची आवक येत आहे. गेल्या चार आठवड्यांमध्ये ७ ते १५ क्विंटल भेंडीची आवक झाली, तर सरासरी ८०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. गुरुवारी १० क्विंटल आवक झाली होती. घाऊक विक्रीचे दर १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल होते, तर किरकोळ विक्री ३० ते ४० रुपये प्रतिकिलो दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.           बाजार समितीतील आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये)

दिनांक     आवक     किमान     कमाल
५ आॅक्टोबर  १५     ८००     १५००
१२ आॅक्टोबर १८     १२००     १५००
१९ आॅक्टोबर ७     १२००     १८००
२६ आॅक्टोबर  १०     १५०० २०००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com