agriculture news in Marathi, ladies fingers, ridge guard and green chili rates increased in Solapur, Maharashtra | Agrowon

सोलापुरात भेंडी, दोडका, हिरवी मिरची पुन्हा तेजीत
सुदर्शन सुतार
मंगळवार, 19 डिसेंबर 2017

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात भेंडी, दोडका, हिरवी मिरची पुन्हा एकदा तेजीत राहिली. त्यांची आवकही तुलनेने कमी राहिली, तरी उठाव चांगला असल्याने तेजी राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात भेंडीची रोज १५ क्विंटल, दोडक्‍याची २० क्विंटल आणि हिरव्या मिरचीची ४० क्विटंलपर्यंत आवक होती. गेल्या पंधरवड्यापासून त्यांच्या आवकेत सातत्याने चढ-उतार होत राहिला; पण मागणी चांगली असल्याने दरातील तेजी वाढली.

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात भेंडी, दोडका, हिरवी मिरची पुन्हा एकदा तेजीत राहिली. त्यांची आवकही तुलनेने कमी राहिली, तरी उठाव चांगला असल्याने तेजी राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात भेंडीची रोज १५ क्विंटल, दोडक्‍याची २० क्विंटल आणि हिरव्या मिरचीची ४० क्विटंलपर्यंत आवक होती. गेल्या पंधरवड्यापासून त्यांच्या आवकेत सातत्याने चढ-उतार होत राहिला; पण मागणी चांगली असल्याने दरातील तेजी वाढली.

अलीकडच्या काही आठवड्यांच्या तुलनेत त्यांची मागणी आणि आवक याचा विचार करता या सप्ताहात त्यांना पुन्हा मागणी वाढल्याचे दिसून आले. शिवाय दरही टिकून राहिले. भेंडीला प्रतिदहा किलोसाठी १०० ते ३०० रुपये, दोडक्‍याला ८० ते २५० रुपये आणि हिरव्या मिरचीला ९०  ते ३०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय काकडी, गाजरालाही चांगला उठाव मिळाला.

काकडीला प्रतिदहा किलोसाठी ७० ते २०० रुपये आणि गाजराला ६० ते १५० रुपये असा दर मिळाला. भाज्यांमध्ये मेथी, कोथिंबीर, शेपू यांचे दरही काहीसे स्थिरच राहिले. भाज्यांची आवक दहा हजार पेंढ्यांपर्यंत राहिली. मेथीला प्रतिशंभर पेंढ्यांसाठी २०० ते ३०० रुपये, शेपूला १०० ते २५० रुपये आणि कोथिंबिरीला १५० ते २७० रुपये असा दर मिळाला. पालक आणि चुक्‍याला प्रत्येकी २५० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

कांद्याच्या दरातील तेजी टिकून
कांद्याच्या दरातील तेजी या सप्ताहातही पुन्हा टिकून राहिली. कांद्याची आवक मात्र या सप्ताहात मोठ्या प्रमाणात वाढली. रोज ३०० ते ४०० गाड्यांपर्यंत राहिली. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी शनिवारी ही आवक तब्बल ५०९ गाड्यांपर्यंत उच्चांकी आवक झाली. पण संपूर्ण सप्ताहात दर मात्र तेजीत आणि टिकून राहिले. कांद्याला प्रतिक्विंटल २०० ते ४००० व सरासरी २२०० रुपये इतका दर राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

इतर अॅग्रो विशेष
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...
शेतकरी कंपन्यांनी राबवला थेट विक्रीचा...राज्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना...
सिंचन विहिरी, फळबागांचा निधी थेट बँक...मुंबई: मनरेगा योजनेतून शेतकऱ्यांना सिंचन...
वनामकृविचे कुलगुरू मराठी भाषिक असावेतपरभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...
मराठवाड्यात आठ लाख ७५ हजार टन रासायनिक...औरंगाबाद: मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत रासायनिक...
‘डिमोशन’ रोखण्यासाठी अनेकांची पळापळ;...अकोला ः राज्याच्या कुठल्याही विभागात नसेल असा...
देशात खरीप पेरणीला प्रारंभनवी दिल्ली ः देशात खरीप हंगाम २०१८-१९ च्या...
विदर्भात उष्णतेची तीव्र लाट; चंद्रपूर,...पुणे : विदर्भात उन्हाचा ताप वाढल्याने उष्णतेची...
सूत उत्पादनात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानीजळगाव : कापूस गाठींच्या उत्पादनाप्रमाणे सुताच्या...
कृषी विभागातील समुपदेशन बदल्या स्थगित;...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने...
शेतीतील नव तंत्रज्ञानाचा मार्ग मोकळा...अकोला :  भारतीय शेतकरी जागतिक बाजारात...
उपाय आहेत, इच्छाशक्ती हवी ! पुणे : राज्यात दुधाच्या गडगडलेल्या दरामुळे...
किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी...आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध उत्पादनात अग्रेसर...
शालेय पोषण आहार, अंगणवाडीत दूध पुरवा :...राज्यात सध्या दूध दराचा प्रश्‍न चव्हाट्यावर आहे....
दूधधंदा मोडून पडल्यास शेतीतील समस्या...शेतकऱ्यांना वस्तुस्थिती न सांगता त्यांच्या...
दूधदर प्रश्‍नी हवी ठोस उपाययोजना : संघदूध भुकटीला मागणीला नसल्याने अतिरिक्त दूध बाजारात...
दूधकोंडी फोडण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी...दूध उत्पादक शेतकरी दर मिळत नसल्याने अडचणीत आले...
उत्पादकता, गुणवत्ता सुधारणे आवश्‍यकपुणे : भारत दूध उत्पादनात जगात आघाडीवर असला तरी...
दूध उत्पादकांना २८ रुपये दर देणे शक्य...सरकारने जाहीर केलेल्या दरापेक्षा लिटरमागे दररोज...