agriculture news in marathi, Lakhganga farmers decide's to sale free milk | Agrowon

ठरलं...दूध फुकट घालायचं ! लाखगंगा ग्रामसभेचा ठराव
टीम अॅग्रोवन
रविवार, 22 एप्रिल 2018

औरंगाबाद : न परवडणाऱ्या दरात सोसायटीला व विविध डेअरींना दूध घातल्यापेक्षा ते फुकटचं देण्याचा ठराव दूध उत्पादकांनी घेतला आहे. जिल्ह्यातील लाखगंगा (ता. वैजापूर) या दूध उत्पादकांच्या गावातील विशेष ग्रामसभेनं शनिवारी (ता. २१) हा ठराव घेतला. शासनाच्या धोरणाचा अहिंसात्मक मार्गाने निषेध नोंदविण्याची भूमिका येथील दूध उत्पादकांनी घेतली आहे. जोपर्यंत जाहीर केलेले दर मिळत नाहीत, तोपर्यंत दूध फूकट घालण्याचा हा ठराव वैजापूर तहसीलदारांना पाठविण्यात येणार आहे. याप्रसंगी अौरंगाबादसह नगर जिल्ह्यातील काही गावातील दूध उत्पादक उपस्थित होते.

औरंगाबाद : न परवडणाऱ्या दरात सोसायटीला व विविध डेअरींना दूध घातल्यापेक्षा ते फुकटचं देण्याचा ठराव दूध उत्पादकांनी घेतला आहे. जिल्ह्यातील लाखगंगा (ता. वैजापूर) या दूध उत्पादकांच्या गावातील विशेष ग्रामसभेनं शनिवारी (ता. २१) हा ठराव घेतला. शासनाच्या धोरणाचा अहिंसात्मक मार्गाने निषेध नोंदविण्याची भूमिका येथील दूध उत्पादकांनी घेतली आहे. जोपर्यंत जाहीर केलेले दर मिळत नाहीत, तोपर्यंत दूध फूकट घालण्याचा हा ठराव वैजापूर तहसीलदारांना पाठविण्यात येणार आहे. याप्रसंगी अौरंगाबादसह नगर जिल्ह्यातील काही गावातील दूध उत्पादक उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या संपादरम्यान शासनाने मान्य केलेल्या मागण्यांमध्ये दुधाला सत्तावीस रुपये प्रतिलिटरचा दर देण्याचं जाहीर केलं होतं. परंतु जाहीर केलेला दर उत्पादकाला मिळाला नाही. काही दिवस काही भागांत पंचवीस रुपये प्रतिलिटरपर्यंत गेलेला दूध दर दहा ते बारा रुपयांनी खाली घसरला. त्यामुळे उत्पादनाचे गणित कोलमडलेले दूध उत्पादक अडचणीत आले. लाखगंगा या जवळपास दीड ते दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावात ८० टक्‍के लोक दुग्धोत्पादनाचा व्यवसाय करतात.

घसरलेल्या दुधाच्या दरामुळे हे सर्व दूध उत्पादक अडचणीत आले होते. यावर काय निर्णय घ्यावा म्हणून चिंतन करीत असलेल्या ग्रामस्थांनी शनिवारी दुधाच्या घसरलेल्या दराविषयी चिंतन करून निर्णय घेण्यासाठी ग्रामसभा बोलावली. या ग्रामसभेला लाखगंगा येथील दूध उत्पादकांसह पंचक्रोशीतील वैजापूर, नगर जिल्ह्यातील राहता तालुक्‍यातील वीस ते पंचवीस गावांतील दूध उत्पादक, काही गावचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, सोसायट्यांचे चेअरमन यांची उपस्थिती होती. 

शेतकरी नेते डॉ. अजित नवले, धनंजय धोर्डे यांनीही या ग्रामसभेला विशेष उपस्थिती लावली.  संपूर्ण चर्चेअंती येत्या ३ मेपासून सर्व दूध उत्पादक सोसायट्या व डेअऱ्यांना फुकट दूध घालतील, असा ठराव घेण्यात आला. या ठरावाचे सूचक राजेंद्र तुरकने, तर अनुमोदक विलास मोरे होते.
....
असे झाले ठराव...

  • पंचक्रोशीतील ग्रामसभांमधून ठरावासाठी करणार जागर
  • प्रसंगी विविध तहसील कार्यालयावर वाटणार मोफत दूध
  • शासनाने जाहीर केलेला २७ रुपये प्रतिलिटरचा दर देण्याची मागणी

प्रतिक्रिया...
 तीन मेपासून फुकट दूध घालण्याचा निर्णय घेतला आहे. तो तहसील कार्यालयाकडे पाठवू;  शिवाय विविध तहसील कार्यालयांवर मोफत दूधवाटपाचा कार्यक्रमही ठेवू.
- दिगंबर तुरकने, 
सरपंच, लाखगंगा, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद. 
....
लाखगंगा येथील विशेष ग्रामसभेनं घेतलेला ठराव प्रत्येक दूध उत्पादक गावातील ग्रामसभांनी घ्यावी, यासाठी जागर केला जाईल. यामधून शासनाला आश्वासीत दूधदराबाबत जागे करण्याचा प्रयत्न केला जाईल.
- धनंजय धोर्डे, 
शेतकरी नेते, वैजापूर, जि. औरंगाबाद. 
....
जाहीर केलेल्या दराच्या तुलनेत दहा रुपयांचा दरोडा उत्पादकांच्या दुधावर टाकला जातोय. लाखगंगेची ग्रामसभा म्हणजे शासनाच्या धोरणावर दूध उत्पादकांनी व्यक्‍त केलेला संताप आहे. नगर जिल्ह्यात याविषयी जागर व ठिकठिकाणी मोफत दूध वाटपाचे कार्यक्रम घेतले जातील. पैसे नको म्हणून प्रतिज्ञापत्रही लिहून दिले जातील. किमान शासनानं आता तरी जागं व्हावं. 
- डॉ. अजित नवले
राज्य सरचिटणीस किसान सभा महाराष्ट्र
..........
दूध दराचा मुद्‌दा औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या स्टॅंडींग कमिटीच्या मिटिंगमध्ये मांडणार. लाखगंगा येथील ग्रामसभेप्रमाणेच दूध उत्पादकांच्या हिताचा ठराव जिल्हा परिषदेनेही घेण्यासाठी आपण आग्रही राहू. 
- पंकज ठोंबरे,
जिल्हा परिषद सदस्य, औरंगाबाद. 

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...