agriculture news in marathi, Lakhganga milk producers agitating on milk issue | Agrowon

लाखगंगात आंदोलन सुरूच; तिसऱ्या दिवशीही फुकट दूधवाटप
टीम अॅग्रोवन
रविवार, 6 मे 2018

औरंगाबाद : जोपर्यंत जाहीर केलेला हमीदर मिळत नाही, तोपर्यंत संकलन केंद्रावर घातलेल्या दुधाच्या स्लिप न घेण्याचे धोरण लाखगंगासह अनेक गावांतील दूध उत्पादकांनी कायम ठेवले आहे. तिसऱ्या दिवशीही मोफत दूधवाटप आंदोलन सुरूच होते. 

औरंगाबाद : जोपर्यंत जाहीर केलेला हमीदर मिळत नाही, तोपर्यंत संकलन केंद्रावर घातलेल्या दुधाच्या स्लिप न घेण्याचे धोरण लाखगंगासह अनेक गावांतील दूध उत्पादकांनी कायम ठेवले आहे. तिसऱ्या दिवशीही मोफत दूधवाटप आंदोलन सुरूच होते. 

औरंगाबाद जिल्ह्यातील लाखगंगा गावाने घसरलेल्या दूधदराच्या प्रश्नावर आंदोलनाची तीव्रता वाढत चालली आहे. जाहीर केलेला २७ रुपये प्रतिलिटरचा हमीदर मिळत नाही, तोपर्यंत दूध फुकट वाटण्यासह संकलन केंद्रात घातलेल्या दुधाच्या पावत्या किंवा पैसे न स्वीकारण्याचा निर्णय घेतला अाहे. लाखगंगा येथील दूध संकलन शुक्रवारी (ता. ४) जवळपास १७०० ने घटून २८०० वर आले होते. शनिवारी (ता. ५) हे संकलन २ हजार लिटरने घटून २५०० वर अल्याची माहिती दूध उत्पादकांनी दिली. टप्प्याटप्प्याने दूध उत्पादक प्रशासकीय कार्यालयावर जाऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोफत दूधवाटपाचे काम करीत असून, सोमवारी (ता. ७) वैजापूर तालुक्‍यातील काही गावचे दूध उत्पादक तहसील कार्यालय व इतर प्रशासकीय कार्यालयांत मोफत दूधवाटप करणार असल्याची माहिती दूध उत्पादकांनी दिली. 

सरकारने आतातरी जागं व्हावं...
दूध उत्पादक सहकाऱ्यांची चिंता मलाही त्रास देतेय. माझ्याकडे चार गायी होत्या. त्यापैकी तीन मी दुधाला मिळणारे दर खर्चाला परवडत नसल्याने विकल्या. केवळ दरापायी शेतीसाठी सर्वांत जास्त फायद्याचा पूरक उद्योग हातचा गेला. अनेकांच्या दावणी रिकाम्या होत आहेत. मायबाप सरकारनं आता तरी जागं व्हावं, अशी भावना लाखगंगा येथील सूर्यकांत चांदगुडे यांनी व्यक्‍त केली. 

गावात जवळपास २९० दुभतं गोधन. त्यामधील २० ते २५ दुभती जनावरं अलीकडे दोन महिन्यांत विकली गेली, विकणं सुरूच आहे. दोन महिन्यांत अडीचशे लिटरने दूध उत्पादन घटलं. नव्याने शेतीपूरक उद्योग म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळलेला गावातील तरुण निराशेच्या गर्तेत सापडला आहे. शासनाने तत्काळ दूध दरावर उत्पादकांना धीर देणारा निर्णय न घेतल्यास कुणीही पूरक उद्योग करण्यास धजावणार नाही. 
- संदीप बारसे, दूध उत्पादक, वीरगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद 

इतर अॅग्रो विशेष
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...