अाणखप एका चारा घोट्याळ्यात लालूप्रसाद यादव दोषी

लालूप्रसाद यादव
लालूप्रसाद यादव

नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव हे पशुखाद्य गैरव्यवहारप्रकरणी तिसऱ्या प्रकरणातही दोषी आढळले आहेत. रांची येथील विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एस. प्रसाद यांनी याबाबत निकाल दिला.  १९९२-९३ मध्ये चैबसातील खजिन्यातून सुमारे ३३ कोटी ६७ लाख रुपये काढल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांची पशुखाद्य गैरव्यवहाराच्या दुसऱ्या प्रकरणात न्यायालयाने डिसेंबरमध्ये निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, त्यांची तिसऱ्या प्रकरणात चैबसा खजिन्यातून निधीचा घोटाळा केल्याच्या आरोपावरून न्यायालयाने त्यांना दोषी ठरविले आहे. मात्र, मिश्रा यांना अद्याप शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने ५६ पैकी ५० आरोपींना दोषी ठरवले.   दरम्यान, लालूप्रसाद यादव यांना पशुखाद्य गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने साडेतीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. लालू हे सध्या तुरुंगात असून, तेथे ते माळीकाम करत असल्याची माहिती मिळत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com