agriculture news in Marathi, Laluprasad Yadav convicted in fodder scam, Maharashtra | Agrowon

चारा घोटाळ्यात लालूप्रसाद यादव दोषी
वृत्तसेवा
रविवार, 24 डिसेंबर 2017

नवी दिल्ली ः राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना देशातील चारा घोटाळा प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शनिवारी (ता. २३) दोषी ठरविले आहे. लालूप्रसाद यादव यांच्यासह एकूण १५ दोषींना ३ जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश शिवपाल सिंग यांनी हा निकाल दिला. 

नवी दिल्ली ः राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना देशातील चारा घोटाळा प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शनिवारी (ता. २३) दोषी ठरविले आहे. लालूप्रसाद यादव यांच्यासह एकूण १५ दोषींना ३ जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश शिवपाल सिंग यांनी हा निकाल दिला. 

सोमवारपासून न्यायालयाला ख्रिसमसनिमित्त सुटी असल्यामुळे न्यायालयाचे कामकाज २ जानेवारीला सुरू होईल. त्यानंतर ३ जानेवारीला लालूप्रसाद यादव यांच्यासह १५ दोषींना चारा घोटाळ्यात शिक्षा सुनावली जाणार आहे. लालू प्रसाद यादव यांना दोषी ठवविल्यानंतर लगेच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांना रांची तुरुंगात ठेवण्यात येणार आहे.

चारा घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्यावर एकूण पाच केस सुरू आहेत. त्यापैकी तीन केसचा निकाल अजून लागायचा आहे. देवगड जिल्ह्यात १९९१ ते ९४ या काळात देशाच्या तिजोरीतून चुकीच्या प्रकारे ८९.२७ लाख रुपये काढून गैरव्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणी एकूण ३८ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यापैकी केसचा तपास आणि सुनावणीच्या काळात ११ जणांचा मृत्यू झाला होता आणि २००६-०७ मध्ये दोन जणांना दोषी ठरविण्यात आले होते.  

३ जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार आहे. मात्र तोपर्यंत लालूप्रसाद यादव यांचा मुक्काम तुरुंगातच असणार आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे लालूप्रसाद यादव यांचे नवे वर्ष तुरुंगातच जाणार आहे. कोट्यवधी रुपयांचा चारा घोटाळा देशभरात चांगलाच गाजला होता. चारा घोटाळा प्रकरणात जगन्नाथ मिश्रा यांच्यासह एकूण ६ जणांना दोषमुक्त करण्यात आले आहे.

इतर अॅग्रो विशेष
‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री...पुणे ः ॲग्रिकल्चर सेक्टरमधील खते, बी - बियाणे,...
उत्पादकांना मिळावा उत्पादनवाढीचा लाभदेशातील काही भागांत विशेषत: कर्नाटक, तमिळनाडू व...
सेसवसुली नव्हे; सर्रास लूटजळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे आवाराबाहेर...
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी...बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी...
पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्यपुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी...
‘मेकुणू’ चक्रीवादळ होणार अतितीव्रपुणे : अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या ‘मेकुणू’...
कोकणात शनिवारपासून पाऊस?पुणे : अरबी समुद्रात अालेले ‘मेकुणू’ चक्रीवादळ...
खरिपासाठी पैशांची तजवीज करण्यात शेतकरी...अकोला  ः अागामी हंगामाला अाता अवघा...
सेस वसुलीच्या मुद्यावर प्रशासन, जळगाव...जळगाव ः भाजीपाला व फळे नियमनमुक्त केल्याने...
यंदा वापरा घरचेच सोयबीन बियाणेपुणे : राज्यात गेल्या हंगामात झालेल्या अवेळी...
प्रयोगशील कांदा शेतीत ठळक अोळख मिळवलेले...नाशिक जिल्हा कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. त्यातही...
गोकुळानं ‘गणित’ नाही मांडलंपशुपालनातून दूध व्यवसाय म्हणजे मुळातच उद्योग आहे...
ब्राझीलचा धडा घेणार कधी?सातत्याने दोन वर्षांच्या चांगल्या पाऊसमानानंतर...
उत्तर प्रदेशातील कारखान्यांची अतिरिक्त...नवी दिल्ली ः बाजारात साखरेचे पडलेले दर आणि...
भारतात गोड्या पाण्याची उपलब्धता घटलीवॉशिंग्टन ः भारतात उपलब्ध पाण्याचा आणि पाणी...
कापसाच्या ३७० वाणांच्या विक्रीला...नगर  ः बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कमी आणि...
अधिकाऱ्यांनी कोंडून दिली खुनाची धमकीपुणे  : कृषी खात्यातील पाणलोट व मृद्संधारण...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भ, मध्य...
वादळाने बाष्प खेचून नेले; अरबी समुद्रात...पुणे : अरबी समुद्रात मंगळवारी कमी तीव्रतेचे वादळ...
हिरापूरच्या बैल बाजारात चार कोटींवर...बीड : हिरापूर (ता. गेवराई) येथे बैलांचा आठवडे...