agriculture news in marathi, land acquisition | Agrowon

सार्वजनिक हेतूसाठी संपादित ग्रामीण जमिनींना चौपट मोबदला
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 जानेवारी 2018

मुंबई : सार्वजनिक हेतूसाठी राज्यात भूसंपादन अधिनियम-२०१३ या कायद्यासह इतर काही कायद्यांनुसार खासगी जमिनींचे संपादन करण्यात येते. ग्रामीण भागातील जमिनीसाठी भूसंपादन अधिनियम-२०१३ नुसार देण्यात येणारी बाजारभावाच्या चार पट रक्कम इतर कायद्यांनुसार देता येण्यासाठी २०१३ च्या अधिनियमात सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (ता. १७) मंजुरी देण्यात आली.

मुंबई : सार्वजनिक हेतूसाठी राज्यात भूसंपादन अधिनियम-२०१३ या कायद्यासह इतर काही कायद्यांनुसार खासगी जमिनींचे संपादन करण्यात येते. ग्रामीण भागातील जमिनीसाठी भूसंपादन अधिनियम-२०१३ नुसार देण्यात येणारी बाजारभावाच्या चार पट रक्कम इतर कायद्यांनुसार देता येण्यासाठी २०१३ च्या अधिनियमात सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (ता. १७) मंजुरी देण्यात आली.

या निर्णयानुसार भूसंपादन अधिनियम-२०१३ मधील कलम १०५ (अ) व शेड्यूल पाचमध्ये राज्यातील चार कायद्यांचा समावेश करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्ग अधिनियम-१९५५, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम-१९६१, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अधिनियम-१९७६ आणि महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम-१९६६ यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे या चार राज्य कायद्यांतर्गत भूसंपादन करतानादेखील ग्रामीण भागातील भूधारकास बाजारभावाच्या चार पट मोबदला मिळणार आहे. याशिवाय राज्याने वाटाघाटीद्वारे थेट खरेदीने खासगी जमिनी ताब्यात घेण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसारही जास्तीत जास्त खासगी जमीन शासकीय प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या संमतीने ताब्यात घेण्यात येते. त्यासाठी ग्रामीण भागातील जमीनधारकास बाजारमूल्याच्या पाच पट मोबदला देण्यात येतो.

जलसंधारण महामंडळाच्या सदस्य संख्येत वाढ
महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या कामकाजात संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींचा समावेश होण्यासह लोकसहभाग वाढावा यासाठी महामंडळाच्या सदस्य संख्येत आणखी दोन तज्ज्ञ सदस्यांचा समावेश करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सामाजिक वनीकरण, पाणलोट, जलसंधारण इत्यादी कामांची फलनिष्पत्ती ही लोकसहभागावर अवलंबून असते. जलयुक्त शिवार कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये ही बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. यामुळे महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग मिळविण्यासाठी महामंडळाच्या सदस्यांमध्ये दोन नवीन सदस्यांचा समावेश करण्यात येणार आहे. यामध्ये जलसंधारण व मृद्संधारण क्षेत्राची विशेष माहिती तसेच प्रत्यक्ष अनुभव असलेले, त्याचप्रमाणे लोकसहभागातून जलसंधारण करण्याचा पूर्वानुभव असलेले दोन सदस्य राज्य शासनाकडून नियुक्त करण्यात येतील. यापैकी एक सदस्य हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात येईल.

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...