agriculture news in marathi, land acquisition process become in last stage, buldhana, maharashtra | Agrowon

‘समृद्धी’साठी जमीन संपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात
टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोचली असून हा महामार्ग वऱ्हाडातील वाशीम व बुलडाणा जिल्ह्यातून जात अाहे. या दोन जिल्ह्यांत अाजवर संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांना एक हजार ८६ कोटी रुपये मिळाले अाहेत. बुलडाण्यात सर्वाधिक ६४० कोटी रुपये वाटप झाले अाहेत. वाशीमला ४४६ कोटी रुपये मिळाले. भूसंपादनाची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात पोचली असून, यावर्षी या महामार्गाच्या कामाला सुरवात होईल, असे सांगितले जात अाहे.  

अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोचली असून हा महामार्ग वऱ्हाडातील वाशीम व बुलडाणा जिल्ह्यातून जात अाहे. या दोन जिल्ह्यांत अाजवर संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांना एक हजार ८६ कोटी रुपये मिळाले अाहेत. बुलडाण्यात सर्वाधिक ६४० कोटी रुपये वाटप झाले अाहेत. वाशीमला ४४६ कोटी रुपये मिळाले. भूसंपादनाची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात पोचली असून, यावर्षी या महामार्गाच्या कामाला सुरवात होईल, असे सांगितले जात अाहे.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाकडे पाहिले जात आहे. या महामार्गासाठी आवश्यक जमीन केंद्राच्या नवीन भूसंपादन कायद्यानुसार खरेदी करण्यात अाली. जमिनीच्या प्रकारानुसार, शेतात असणाऱ्या प्रत्येक बाबीचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात अाला अाहे. बुलडाणा जिल्ह्यात या महामार्गासाठी ११३६.८६ हेक्टर जमीन खरेदी करायची होती. अातापर्यंत १००७.२७ हेक्टर जमीन खरेदी झाली अाहे. या जिल्ह्यात अातापर्यंत ९० टक्के काम पूर्ण होत अाले अाहे. १० टक्केच जमिनीची खरेदी व्हायची अाहे. ही प्रक्रिया अाता कायद्यानुसार होणार अाहे. या जिल्ह्यात २५६९ शेतकऱ्यांच्या जमिनींची १८२५ खरेदी झाली अाहे.  

दुसरीकडे वाशीम जिल्हासुद्धा खरेदीच्या बाबतीत अग्रेसर अाहे. या जिल्ह्यात आतापर्यंत ९४३ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. या जमिनीचे मालक असलेल्या अडीच हजार शेतकऱ्यांना सुमारे ४४६ कोटी रुपयांचा मोबदला वाटप करण्यात आला अाहे. समृद्धी महामार्ग हा राज्यात ११ जिल्ह्यांमधून जात अाहे. त्यात वाशीमचाही समावेश अाहे. या जिल्ह्यातील  ५४ गावांमधील १४०९ हेक्टर शेतजमीन संपादित केली जाणार अाहे. यापैकी आतापर्यंत ९४३ हेक्टर जमिनीचे संपादन झाले अाहे.

या महामार्गाच्या जमीन संपादन प्रक्रियेसाठी महसूल अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग करण्यात अाल्या अाहेत. काही जिल्ह्यांमध्ये खरेदी प्रक्रिया पूर्णत्वास अालेली असल्याने मूळ पदावर पाठवण्याची मागणी हे प्रभारी अधिकारी करू लागले अाहेत.   

इतर ताज्या घडामोडी
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...
अकोला जिल्ह्यात १७०० शेततळी पूर्णअकोला   ः शासनाच्या मागेल त्याला शेततळे...
अमरावती जिल्ह्यात रब्बीची २८ टक्के पेरणीअमरावती  ः खरीप हंगाम हातून गेला आहे. शेतकरी...
वन्यप्राणी संरक्षण कायदा रद्द करा ः...यवतमाळ  ः वन्यप्राण्यांचा जिव्हाळा...
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...