agriculture news in marathi, land acquisition status for samrudhi express highway, nashik, maharashtra | Agrowon

समृद्धी महामार्गासाठी नाशिकमध्ये २५ टक्के भूसंपादन
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 डिसेंबर 2017
नाशिक  : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत साधारण २५ टक्के भूसंपादन झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी (ता. २६) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी भूसंपादन टक्केवारी वाढविण्यासाठी रस्ते विकास महामंडळाची यंत्रणा सक्रिय झाली आहे.
 
नाशिक  : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत साधारण २५ टक्के भूसंपादन झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी (ता. २६) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी भूसंपादन टक्केवारी वाढविण्यासाठी रस्ते विकास महामंडळाची यंत्रणा सक्रिय झाली आहे.
 
नागपूर, वर्धा, वाशीम, औरंगाबाद आदी जिल्ह्यांत गेल्या चार महिन्यांत सरासरी ५० टक्‍क्‍यांपर्यंत भूसंपादन झाले असताना, नाशिक जिल्ह्यात मात्र जेमतेम २५ टक्‍क्‍यांपर्यंत हे काम झाले आहे. इगतपुरी व सिन्नर तालुक्‍यांतून १०२ किलोमीटचा समृद्धी महामार्ग प्रस्तावित आहे. त्यासाठी १२८० हेक्‍टर जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे, पण आतापर्यंत २५ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक जमीन संपादित करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.
 
पावसाळ्यात इगतपुरीत रोजच मुसळधार पाऊस होत असल्याने सुमारे दीड महिना प्रशासनाला काम करता आले नाही. त्यानंतर लागलीच समृद्धी विरोधकांच्या आंदोलनाने वातावरण गरम होते. या सर्वांचा परिणाम समृद्धीच्या भूसंपादनावर झाला.
 
विदर्भ, मराठवाड्याच्या दुष्काळी भागातील जमीन संपादन जोरात सुरू आहे. ठाण्यातही जमीन अधिग्रहणाची टक्केवारी ३५ पर्यंत पोचली आहे. मुसळधार पावसाने अडचणी वाढल्या असताना इगतपुरी तालुक्‍यातील आदिवासी गावांमधील ‘पेसा’चा प्रश्‍न उद्‌भवला.
 
सिन्नरच्या सधन गावांतून प्रकल्पाला असलेला विरोध पूर्ण शमलेला नाही. न्यायालयात अनेक याचिका दाखल आहेत. या सर्वांचा प्रकल्पाच्या भूसंपादनावर परिणाम झाला आहे. जमीन घेण्याची प्रक्रिया रेंगाळली आहे. आतापर्यंत ३२५ हेक्‍टर जमीन अधिग्रहणाचे काम झाले आहे. सिन्नरमधील २२५, तर इगतपुरीतील १०० हेक्‍टरचा समावेश आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...