वऱ्हाडात ‘समृद्धी’साठी जमीन खरेदी अंतिम टप्प्यात

समृध्दी महामार्ग
समृध्दी महामार्ग

अकोला  ः नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात अाली आहे. वऱ्हाडातील वाशीम व बुलडाणा जिल्ह्यांत ही टक्केवारी ९० पर्यंत पोचली अाहे. दोन्ही जिल्हे मिळून सुमारे १९११ हेक्टर जमीन संपादित करण्यात यंत्रणांना यश अाले अाहे. राज्यात ७२९०.८७ हेक्टर जमिनीपैकी ६०५७.७४ हेक्टर जमिनीचे गुरुवारपर्यंत (ता.२८) संपादन झालेले आहे.

सरळ खरेदीद्वारे ही जमीन संपादनाची प्रक्रिया राबवली जात असून, बाजारमूल्यापेक्षा अधिक भाव दिला जात अाहे. महामार्गाला सुरवातीच्या काळात असलेला विरोध यामुळे काहीसा कमी झाला. वऱ्हाडातील वाशीम व बुलडाणा या दोन जिल्ह्यांतून हा महामार्ग जाणार अाहे. यात वाशीम जिल्ह्याची ९८८.२५ हेक्टर जमीन वापरली जात असून, अातापर्यंत ९१०.६७ हेक्टर क्षेत्राचे संपादन झाले. ९२.१५ टक्के काम पूर्णत्वास गेले अाहे. बुलडाणा जिल्ह्यातील ११३६.८३ हेक्टर क्षेत्रापैकी एक हजार ३६ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात अाले. येथे जमीन संपादनाचे ८८ टक्के काम झाले अाहे.

या महामार्गासाठी विदर्भात बुलडाणा जिल्ह्याची सर्वाधिक जमीन वापरली जात अाहे. सध्या जमीन संपादनाच्या प्रक्रियेत बुलडाणा जिल्हा राज्यात अग्रस्थानी पोचला अाहे. या जिल्ह्यात आता अवघे १३६ हेक्टर क्षेत्र संपादित करणे बाकी अाहे.

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग पूर्णत्वास गेल्यानंतर या दोन्ही महानगरांचे अंतर कमी होईल. यामुळे शेतकऱ्यांना थेट मुंबईला अापला शेतमाल पोचवता येईल. बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा, जालना, ठाणे, नगर अादी जिल्ह्यांतील आैद्योगिकीकरणाला या महामार्गामुळे चालना मिळेल असेही बोलले जाते. संपादनाची प्रक्रिया पूर्णत्वास गेल्यानंतर तातडीने या महामार्गाचे काम सुरू केले जाईल, असे यंत्रणांनी सांगितले.

समृद्धी महामार्गाला जमीन देण्यासाठी सुरवातीच्या काळात झालेला विरोध खरेदी प्रक्रिया जसजशी पुढे सरकत गेली तसा मावळल्याचे दिसून येते. अनेकांना मिळालेला मोबदला हा समाधानकारक होता. मिळालेल्या पैशांतून काहींनी पूर्वीच्या क्षेत्रापेक्षा अधिक जमीन खरेदी केल्याची उदाहरणे पुढे अाली अाहेत. जमिनीचे क्षेत्र वाढले, चांगले घरदार, गाड्या घेतल्या अाहेत.      

जिल्हानिहाय भूसंपादन (टक्के)
बुलडाणा ८८
वाशीम ९२.१५
नाशिक ७३.४२
अमरावती ९०.७२
वर्धा  ८६.८८
ठाणे  ७३.७३
जालना  ७६.९८
नगर ८४.६८
नागपूर ९२.८०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com