agriculture news in marathi, Land maps in Pune, on one click | Agrowon

पुण्यात जमिनीचे नकाशे एका ‘क्‍लिक’वर
सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

पुणे :  जमिनीशी संबंधित जवळपास १३ प्रकारचे नकाशांचे भूमी अभिलेख विभागाकडून ‘डिजिटायझेशन’ करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना नगर भूमापन (सिटी सर्व्हे) आणि जमिनीशी निगडित इतर नकाशे लवकरच एका क्‍लिकवर उपलब्ध होणार आहेत.

पुणे :  जमिनीशी संबंधित जवळपास १३ प्रकारचे नकाशांचे भूमी अभिलेख विभागाकडून ‘डिजिटायझेशन’ करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना नगर भूमापन (सिटी सर्व्हे) आणि जमिनीशी निगडित इतर नकाशे लवकरच एका क्‍लिकवर उपलब्ध होणार आहेत.

नागरिकांच्या मागणीनुसार विविध प्रमाणातील नकाशांमुळे मोजणीची प्रक्रिया जलद होण्यास मदत होणार आहे. सध्या नागरिकांना जमीन मोजणीसह अन्य जमिनीच्या नकाशांसाठी भूमी अभिलेख कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत होते. त्यावर उपाय म्हणून भूमी अभिलेख विभागाकडे टिपण, फाळणी, फेर स्केच, पोट वाटप, सविस्तर भूमापन, गटबुक, त्रिमितीय नकाशे (ट्रॅंग्युलेशन शीट), नगर भूमापन, भूसंपादन आदी १३ प्रकारचे नकाशे उपलब्ध आहेत.

जूनपासून या नकाशांच्या आकृत्यांचे (पॉलीगॉन्स) स्कॅनिंग करण्याचे काम सुरू आहे. स्कॅन करण्यात आलेले ‘पॉलीगॉन्स’ नकाशे संगणकीय भाषेत (बायनरी लॅंग्वेज) रूपांतरित करून डिजिटलपद्धतीने सर्वरला साठवून ठेवण्यात येत आहे. जून २०१८ पर्यंत हे काम शंभर टक्के पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यात दहा प्रकारचे नकाशे उपलब्ध असून, सुमारे ३७ लाख ८४ हजार ५०९ ‘पॉलीगॉन’चे स्कॅनिंग करण्यात येत आहे. त्यापैकी आतापर्यंत ३ लाख १५ हजार ६२६ पॉलीगॉन स्कॅनिंगचे काम पूर्ण झाले आहे. तर एकूण ३ लाख ९७ हजार नकाशांपैकी ४१ हजार ५८९ नकाशांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. डिजिटायझेशन झालेले नकाशे नागरिकांच्या मागणीनुसार आवश्‍यक त्या आकारांमध्ये (स्केल) पाहणे, आणि त्याच्या प्रति (प्रिंटआऊट) घेणे देखील शक्‍य होणार आहे.

जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाकडून ‘पॉलगॉन्सचे स्कॅनिंग’ आणि नकाशांचे डिजिटायझेशन करणे, संगणकीय प्रणालीमध्ये त्यांची साठवणूक करण्याचे काम सुरू आहे. जून २०१८ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर नागरिकांना संकेतस्थळावर सर्व नकाशे एका क्‍लीकवर पाहता येऊ शकेल.
- एम. बी. पाटील, अधीक्षक भूमी अभिलेख, पुणे

इतर बातम्या
सोलापूर विद्यापीठ उभारणार कृषी पर्यटन...सोलापूर  : सोलापूर विद्यापीठाच्या वतीने हिरज...
नाशिक जिल्ह्यातील सहा धरणे कोरडीनाशिक : जिल्ह्याला एकीकडे पावसाने हुलकावणी...
नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईग्रस्त गावांची...नाशिक : मॉन्सूनचे आगमन होऊनही नाशिक विभागातील...
कर्जमाफीचा पुन्हा बॅंकांनाच फायदा ः...सोलापूर ःशेतकऱ्यांना द्यावयाच्या कर्जमाफीचा...
कर्जमाफीच्या याद्या बॅंकेबाहेर लावापरभणी  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
सोलापूर बाजार समिती निवडणूकीत...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
मुबलक पाणी... पण् पैशाअभावी शेत नापेरजळगाव ः कर्जमाफीच्या यादीत पाच महिन्यांपूर्वी नाव...
एच. टी. तंत्रज्ञानाला मान्यता देऊन...पुणे ः राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या कापूस...
कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज...पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली...
'श्रीं'ची पालखी निघाली पंढरीला...शेगाव जि. बुलडाणा ः श्री संत गजानन महाराज...
नाशिककरांना आज मिळणार जमीन समृद्ध... नाशिक ः ‘समृद्ध माती, जमीन सुपीकता आणि पीक...
सांगलीतील दुष्काळी भागात दूध संकलन घटलेसांगली : जिल्ह्यातील दुष्काळी भागात शेतीबरोबर...
माॅन्सूनची प्रगती शनिवारनंतर ?पुणे : जवळपास आठवडाभरापासून नैऋत्य मोसमी...
`एचटीबीटी` कापूस बियाण्याच्या...पुणे : बोंड अळीला प्रतिकारक म्हणून चढ्या...
पुणे विभागात ७० टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : मॉन्सून दाखल झाल्यानंतरही समाधानकारक...
परभणी विभागात महाबीजचे ३० हजार हेक्टरवर...परभणी : महाबीजच्या परभणी विभागांतर्गत येणाऱ्या...
मराठवाड्यातील ३२ मध्यम प्रकल्पांतील...औरंगाबाद  : मराठवाड्यातील ३२ मध्यम...
तीन जिल्ह्यांत एक लाख २० हजार हेक्टरवर... नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
रत्नागिरीत साडेसहा हजार हेक्‍टरवर भात...रत्नागिरी : समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील ६६६४...
नगरमधील ७ हजारांवर शेतकरी हरभरा...नगर : हरभऱ्याची खरेदी करण्यासाठी सुरू असलेले...