agriculture news in marathi, The larvae found in tur, Jalna, Maharashtra | Agrowon

तुरीत आढळली शेंगा पोखरणाऱ्या अळीची अंडी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

जालना : पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप जवळपास हातचा गेलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांची सारी भीस्त आता तुरीच्या पिकावर आहे; परंतु हे पीकही कळी व फुले लागण्याच्या अवस्थेत असतानाच या पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळींनी अंडी घातल्याचे तज्ज्ञांच्या शिवार पाहणीत समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याविषयी दक्षता घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

जालना : पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप जवळपास हातचा गेलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांची सारी भीस्त आता तुरीच्या पिकावर आहे; परंतु हे पीकही कळी व फुले लागण्याच्या अवस्थेत असतानाच या पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळींनी अंडी घातल्याचे तज्ज्ञांच्या शिवार पाहणीत समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याविषयी दक्षता घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

मराठवाड्यात तुरीचे क्षेत्रही जवळपास ४ लाख ९८ हजार हेक्‍टरवर विस्तारलेले आहे. दरम्यान १९ ऑगस्टनंतर आलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील तुरीच्या पिकाची अवस्था सुधारली. त्यामुळे ऑक्‍टोबरच्या तिसऱ्या आठवड्यातील अंदाजानुसार यंदा तुरीच्या उत्पादनात घट न येण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

जालना जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी, आत्माचे अधिकारी-कर्मचारी यांनी नुकतीच बदनापूर तालुक्‍यातील आसोला, तुपेवाडी, चनेगाव व मसला या गावातील तूर, कापूस, ज्वारी, हरभरा, डाळिंब, पेरू, द्राक्ष आदी पिकांची पाहणी केली. या पाहणीमध्ये या गावशिवारातील तुरीच्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात शेंगा पोखरणाऱ्या अळीने अंडी घातली असल्याचे तज्ज्ञांच्या निदर्शनास आले.

या किडीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी निंबोळी अर्क २० मिलि अधिक क्‍विंनॉलफॉस ३० ई.सी. २० मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पहिल्या फवारणीनंतर १० दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी इमॅमेक्‍टीन बेनझोएट या औषधाची ५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला तज्ञांनी दिला. जिल्हा मासिक चर्चासत्राच्या निमीत्ताने आयोजित पाहणी दौऱ्यात खरपुडी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ अजय मिटकरी, अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष आळसे, एनएआरपीचे ठोंबरे उपस्थिती होते.

इतर ताज्या घडामोडी
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
बीबीएफ तंत्रज्ञानानेच पेरणी, विश्वी...बुलडाणा ः येत्या हंगामात बीबीएफ तंत्रज्ञानाने...
सांगली जिल्ह्यात १८३ गावांना टँकरने...सांगली : जून महिना सुरू होऊन दुसरा आठवडा संपला...
जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे...जळगाव  ः खानदेशात सिंचन प्रकल्पांमध्ये मिळून...
आषाढी वारीत शासकीय महापूजेचा वेळ...सोलापूर : आषाढी एकादशी दिवशीची श्री विठ्ठल-रुक्‍...
जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुलावरून...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
वऱ्हाडात महाबीज बियाणे मिळण्यापूर्वी...अकोला ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम व ग्राम...
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात...सातारा  : टेंभू उपसा सिंचन योजनेतून खटाव...
मंगळवेढा बाजार समितीत वांग्याला राज्यात...मंगळवेढा जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ९८...
पाऊस लांबल्याने आता कोणते पीक घ्यावे?...नगर : मॉन्सून लांबल्याने आता खरीप पिकांत बदल...