agriculture news in marathi, last day for grapes and pomegranate exhibition, Maharashtra | Agrowon

द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस
टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

सोलापूर ः ‘सकाळ-ॲग्रोवन'च्या वतीने भरवण्यात आलेल्या द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनाला शुक्रवारी (ता. ५) सलग दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यासह नजीकच्या सांगली, उस्मानाबाद जिल्ह्यांतूनही मोठ्या संख्येने शेतकरी प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते. प्रदर्शनातील कृषिविषयक विविध ज्ञान-तंत्रज्ञानाची माहिती घेताना, चर्चासत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा शास्त्रज्ञांशीही चांगलाच संवाद रंगला. उद्या, शनिवारी (ता. ६) प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. 

सोलापूर ः ‘सकाळ-ॲग्रोवन'च्या वतीने भरवण्यात आलेल्या द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनाला शुक्रवारी (ता. ५) सलग दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यासह नजीकच्या सांगली, उस्मानाबाद जिल्ह्यांतूनही मोठ्या संख्येने शेतकरी प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते. प्रदर्शनातील कृषिविषयक विविध ज्ञान-तंत्रज्ञानाची माहिती घेताना, चर्चासत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा शास्त्रज्ञांशीही चांगलाच संवाद रंगला. उद्या, शनिवारी (ता. ६) प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. 

सिव्हिल चौकातील ॲचिव्हर्स मल्टिपर्पज हॉलमध्ये प्रदर्शन सुरू आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभर शेतकऱ्यांची रेलचेल सुरूच होती. जिल्ह्यासह उस्मानाबाद, सांगली आदी भागातून शेतकरी आवर्जून आले होते. प्रत्येक स्टॉलवर शेतकरी थांबून माहिती घेत होते. आपल्या शंका विचारत होते, त्या माध्यमातून विक्रेते ते शेतकरी असा संवाद घडला, आधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेल्या द्राक्षाच्या कलम काड्या, डाळिंबातील टिश्‍युक्‍लचर पद्धती, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने तयार केलेला ज्यूस, डाळिंबाची वाईन, तेल आणि औषधी उत्पादनांची माहिती आणि त्याची वैशिष्ट्ये मोठ्या उत्सुकतेने शेतकरी जाणून घेत होते.

त्याशिवाय विविध प्रकारची खते, इन्फास्ट्रक्चर (वायर आणि अँगल) पॉवरटिलर, ब्लोअर, ट्रॅक्‍टर, शेततळे, शेडनेट व हेलग्रीन नेट आदींची माहितीही वेगळी पर्वणी ठरली. प्रदर्शनातील द्राक्ष आणि डाळिंब शेतीशी संबंधित नवीन ज्ञान-तंत्रज्ञानाच्या माहितीने शेतकरी भारावून गेले. दुसरीकडे द्राक्ष-डाळिंबातील चर्चासत्राच्या दालनातून शास्त्रज्ञ-शेतकरी संवादही चांगलाच रंगला. 

आजही चर्चासत्रे
शनिवारी (ता. ६) दुपारी बारा वाजता राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. रामटेके हे ‘द्राक्षातील सुधारित तंत्रज्ञान व संजीवकांचा वापर' या विषयावर तर दुपारच्या सत्रात तीन वाजता प्रगतिशील शेतकरी अंकुश पडवळे हे ‘निर्यातक्षम डाळिंब उत्पादन व गटशेती'' या विषयावर मार्गदर्शन करतील.

इतर अॅग्रो विशेष
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
तुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...
सूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
ठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर  ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...
महिला बचत गटाने सुरू केली बियाणे बँकपाटीलवाडी (धामणवन) (ता. अकोले, जि. नगर) या...
शेती अन् ग्रामविकासासाठी आलो एकत्रअकोला शहरात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांनी...
थेट शेतीमाल विक्री ठरली नावापुरतीचपुणे  ः फळे भाजीपाला नियमनमुक्तीनंतर शेतकरी...
‘सीसीआय’च्या खरेदी केंद्रासाठी...जळगाव  ः खासगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीसंबंधी...
गटशेतीला प्रोत्साहनासाठी निकषांत बदलपुणे : राज्याच्या गटशेती धोरणाला आलेली मरगळ...
जळगावला ‘हीट’चा चटका ः पारा ३८ अंशांवरपुणे : राज्यात ऑक्टोबर हीटच्या चटक्यात जळगाव...
संकटातील सूतगिरण्यांना वीज दरवाढीचा...कोल्हापूर : महावितरणने वीज दरवाढीचा बडगा...
उसाच्या जनुकीय संरचनेतून उलगडली अनेक...गेल्या अनेक शतकांपासून ऊस हे पीक साखरेसोबतच...
दुर्गम सातपुड्यात नवतंत्रज्ञानाचा...नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतातील दुर्गम धनाजे...
‘ब्रॉयलर’ संगोपनासोबत भक्कम विक्री...नांदेड जिल्ह्यातील झरी (ता. लोहा) येथील मारुतीराव...
चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्यास सुरवातपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले तितली...
टेंभू योजनेचे पाणी घाटमाथ्यावर कधी येणारसांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी...