agriculture news in marathi, In the last phase of preparation for the crushing season in Satara | Agrowon

साताऱ्यात गाळप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

सातारा ः ऊस गाळप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, कारखान्यांचे कर्मचारी साखर उतारा पाहण्यासाठी ऊस घेऊन जात आहेत. ऊस तोडणीसाठी गावागावात मजूर उपस्थित झाले आहे. दिवाळीच्या दरम्यान जिल्ह्यात अनेक कारखाने प्रत्यक्ष हंगाम सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सातारा ः ऊस गाळप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, कारखान्यांचे कर्मचारी साखर उतारा पाहण्यासाठी ऊस घेऊन जात आहेत. ऊस तोडणीसाठी गावागावात मजूर उपस्थित झाले आहे. दिवाळीच्या दरम्यान जिल्ह्यात अनेक कारखाने प्रत्यक्ष हंगाम सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात या हंगामात १७ साखर कारखान्यांकडून गाळप होईल, असा अंदाज आहे. या कारखान्यापैकी अनेक कारखान्यांचे बॅायलर प्रदीपन झाले असून, साखर उताऱ्यासाठी उसाचे नुमने घेण्याचे काम वेगात सुरू आहे. जिल्ह्यात या गाळप हंगामासाठी ८० हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध असल्याने गाळप हंगाम लांबण्याची शक्यता आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत कारखान्यांची संख्या तीनने वाढली आहे. यामुळे कोणत्या कारखान्याचे किती ऊस मिळेल हे हंगामात स्पष्ट होणार आहे. जास्तीत जास्त ऊस वेळेत येण्यासाठी ऊसतोड मजुरांची भूमिका महत्त्वाची असल्याने क्षमता मोठी असलेल्या कारखान्यांनी जून महिन्यापासून करारावर लक्ष दिले आहे. सध्या मजूर दाखल होऊ लागले आहेत.

गावागावात राहुट्या उभारणीच्या कामात व्यस्त असलेल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. कर्नाटक राज्याच्या विविध भागांतून मजूर आणले जात आहेत. तसेच अनेक कारखान्यांनी ऊसतोडणीसाठी मशिनची खरेदी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी मशिन खरेदी करता यावी यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने पुढाकार घेतल्याने मशिनच्या संख्येत वाढ झाली आहे. या हंगामाच्या सुरवातीपासून मशिनद्वारे ऊसतोड केली जाणार आहे.   

दिवाळी गोड होणार का?
गतवर्षी १४ कारखान्यांनी ८९ लाख टनांवर उसाचे गाळप केले आहे. या हंगामाच्या सुरवातीस साखरेचे दर चांगले असल्याने एफआरपीपेक्षा जास्त दर दिला होता. काही कारखान्यांनी तीन हजार दर जाहीर केला होता. मात्र, त्यानंतर साखरेचे दर कमी झाल्याने सर्वच कारखान्यांकडून दर कमी करण्यात आला होता. हंगामच्या अंतिम टप्प्यात एफआरपी रक्कम पूर्ण केली होती. दर जाहीर केल्याप्रमाणे दर देऊन दिवाळी गोड करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

 

इतर बातम्या
मॉन्सून एक्सप्रेस कोकणात दाखल;...पुणे : अरबी समुद्रात आलेल्या वायू चक्रीवादळामुळे...
कृषी विभाग म्हणते, पॉलिहाउस, शेडनेट...जळगाव ः खानदेशात १ ते ११ जून यादरम्यान झालेल्या...
केळी पीकविमाधारकांना परताव्यांची...जळगाव  ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत...
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाअभावी... कोल्हापूर  : अनेक ठिकाणी पेरण्या झाल्या...
कांदा निर्यात, प्रक्रियेवर भर गरजेचा ः...राजगुरुनगर, जि. पुणे : कांदा बाजारभावातील अनिश्‍...
सात महिन्यांपूर्वी विकलेल्या मुगाचे...अकोला ः नाफेडने खरेदी केलेल्या मुगाचे पैसे सात...
महावितरण’द्वारे देखभाल, दुरुस्तीची ९०३३...‘सातारा : थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व...
रत्नागिरीत खतनिर्मिती कारखान्यावर छापारत्नागिरी : येथील एमआयडीसी परिसरात मच्छीच्या...
आषाढी पालखी सोहळ्यासाठी आरोग्य विभाग...पुणे : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर...
गोंदिया जिल्ह्यात २ लाख हेक्‍टरवर...गोंदिया ः राइससिटी असा लौकिक असलेल्या गोंदिया...
आमदार दीपिका चव्हाण यांनी मांडली...नाशिक : जिल्ह्यातील बागलाण व चांदवड तालुक्यातील...
औरंगाबाद जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती औरंगाबाद : जिल्ह्यातील ७७८ गाव व २७२...
नाशिकला ‘राष्ट्रवादी युवक’चे रेल रोको...नाशिक  : केंद्र व राज्य सरकारच्या अपयशामुळे...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कापूस...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २०१८-...
जतला कर्नाटकातून पाणी मिळणे धूसरसांगली : कर्नाटकातून कृष्णेचे पाणी जत तालुक्याला...
आषाढी वारीत ३५ हजार विद्यार्थी करणार...सोलापूर : आषाढी वारीत पाच विद्यापीठांतील ३५ हजार...
कात्रजकडून गायीच्या दूध खरेदीदरात वाढपुणे  : दुष्काळी स्थितीत दूध उत्पादक...
सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थी हिस्सा...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत...
कृषी विभागात बदल्यांची धूमपुणे  : राज्यात ऐन खरिपाच्या नियोजनात कृषी...
विधीमंडळ अधिवेशन ः सलग तिसऱ्या दिवशीही...मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही...