म्हैसाळ योजनेचे आवर्तन अंतिम टप्प्यात

म्हैसाळ योजनेचे आवर्तन अंतिम टप्प्यात
म्हैसाळ योजनेचे आवर्तन अंतिम टप्प्यात

सांगली : म्हैसाळ योजनेचे मार्च महिन्याच्या आठवड्यात सुरू झालेले आवर्तन आता अंतिम टप्प्यात आहे. ९० पेक्षा अधिक दिवस चाललेल्या आवर्तनातून तब्बल पाच टीएमसी पाणी कृष्णा नदीतून उपसा करून दुष्काळी भागात म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून पोचविले आहे. यंदाच्या उन्हाळी आवर्तनावेळी करण्यात आलेल्या वसुलीचा चार तालुक्यांचा आकडाही तब्बल २ कोटी २९ लाख रुपये इतका आहे, अशी माहिती म्हैसाळ उपसा सिंचन विभागाच्या सूत्रांनी दिली.

यंदाच्या उन्हाळी आवर्तनात सुरवातीस दोन महिन्यांत सव्वा दोन टीएमसी तर अंतिम महिन्यात वाढलेल्या पंप संख्येमुळे आणि विनाखंड सुरू असलेल्या आवर्तनामुळे आजअखेर पाच टीएमसी पाणी कृष्णा नदीतून उपसा करून दुष्काळी भागात कालवे आणि उपकालवे यांच्याद्वारे पोचविले आहे.

म्हैसाळ योजनेच्या एकूण १०३ पंपांपैकी अगदी ८० पंप सक्षमपणे सुरू राहिले. तीनही महिन्यांत ७० ते ७८ ची पंपसंख्या सरासरीने राहिली आहे. यापूर्वी ती फक्त ६५ पर्यंत जाऊ शकली होती. सर्व पंप सरासरी ८०० ते ११०० अश्‍वशक्ती इतक्या क्षमतेचे असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी उपसता आले.

योजनेचे दीड महिने आवर्तन होऊनही जत तालुक्याला क्षमतेने पाणी मिळत नाही, अशी तक्रार जत येथील आमदारांनी केल्यानंतर उपाययोजना करून १०० वरून १५० क्युसेक विसर्ग करण्याचा प्रयत्न यशस्वी केला. वसुलीच्या बाबतीत शासनाच्या ८१ टक्के शासनाकडून आणि १९ टक्के शेतकऱ्यांनी बिल भरावयाच्या धोरणाला शेतकऱ्यांनी यावेळी चांगला प्रतिसाद दिला. अर्थात खात्यानेही हे जाणीवपूर्वक प्रबोधन केले त्याचा फायदा दिसून आला. त्यामुळे कमी कष्टात यंदाच्या वसुलीचा आकडा २ कोटी २९ लाख इतका झाला आहे.

म्हैसाळ योजना केंव्हाही बंद होण्याची शक्यता आहे. चार दिवसांत हा निर्णय होऊ शकतो. कारण वीज तोडणेबाबत महावितरणने दोन दिवसांपूर्वी नोटीस म्हैसाळ योजनेला दिली आहे. त्यामुळे जुलै महिन्यात आता माॅन्सूनवरच भरवसा ठेवावा लागणार आहे.

३६ हजार हेक्टर क्षेत्र योजनेच्या कक्षेत तासगाव : २४ लाख ३४ हजार रुपये, जत : २४ लाख ५१ हजार इतकी वसुली दिली आहे. दंडातून ७ लाख वसूल विनापरवाना मोटारी बसविणे, टँकरने अथवा वसुली न देता चोरून पाणी शेतीला नेणे अशा गैरप्रकारांना आळा घालत धडक मोहीम हाती घेतली. शेतकऱ्यांच्या मोटारी बंद केल्या तर सुरवातीस त्यांचे दंड घेऊन वसुलीत रुपांतर केले. हा आकडा सात लाख रुपये इतका आहे. १५ ते २० हजार हेक्टर क्षेत्र भिजले उन्हाळी आवर्तनात यंदाच्या उन्हाळी आवर्तनातून म्हैसाळ योजनेचे जिल्ह्यातील तीन-चार तालुक्यातील १५ ते २० हजार हेक्टर क्षेत्र भिजले असल्याचा दावा खात्याने केला आहे. म्हैसाळ योजनेचे मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, जत, सांगोला आणि मंगळवेढा या सहा तालुक्यातील लाभक्षेत्र ८१ हजार ६९७ हेक्टर इतके तर जिल्ह्यातील तीन तालुक्यातील क्षेत्र ४७ हजार हेक्टर आहे. आजअखेर ३६ हजार हेक्टर क्षेत्र योजनेच्या कक्षेत आले आहे.

वसुलीत मिरज आघाडीवर २ कोटी २९ लाख या रकमेत मिरज तालुक्याने सर्वाधिक सुमारे १ कोटी २७ लाख रुपये वसुली दिली. कवठेमहांकाळ : ४६ लाख ६२ हजार रुपये.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com