agriculture news in marathi, last season Tur full in godowns | Agrowon

गेल्या हंगामातील तूर अद्यापही गोदामात पडून
टीम अॅग्रोवन
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

अकोला : गेल्या हंगामात खरेदी केलेली लाखो क्विंटल तूर ठिकठिकाणच्या गोदामांमध्ये पडून अाहे. नवीन खरेदीला खऱ्या अर्थाने शुक्रवार (ता. २)पासून राज्यात सुरवात झाली. त्यामुळे ही नवीन तूर खरेदी साठविण्याचा प्रश्न काही केंद्रांवर निर्माण होऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे अाहे.

अकोला : गेल्या हंगामात खरेदी केलेली लाखो क्विंटल तूर ठिकठिकाणच्या गोदामांमध्ये पडून अाहे. नवीन खरेदीला खऱ्या अर्थाने शुक्रवार (ता. २)पासून राज्यात सुरवात झाली. त्यामुळे ही नवीन तूर खरेदी साठविण्याचा प्रश्न काही केंद्रांवर निर्माण होऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे अाहे.

गेल्या हंगामात शासनाने हमीभावाने खरेदी केलेली तूर तशीच पडून अाहे. काही प्रमाणात व्यापाऱ्यांना ही तूर देऊन विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न झाला. परंतु संपूर्ण साठा उचलला गेलेला नाही. सद्यःस्थितीत गोदांमामध्ये लाखो क्विंटल तूर पडून अाहे. ही तूर हलविण्याची प्रक्रिया सुरू असली तरी त्याला गती नाही. शुक्रवारी या हंगामातील तूर खरेदीला सुरवात झाली. प्रत्येक केंद्रावर क्षमतेनुसार दररोज नोंदणी असलेल्या किमान ४० ते ५० शेतकऱ्यांना मेसेज देऊन सुरवातीला बोलविले जाईल. खरेदी सुरू झाल्याने दररोज हजारो क्विंटल तूर खरेदी होणार. त्यामुळे साठवणुकीचा प्रश्न पुढील महिन्यात निर्माण होऊ शकतो. एकट्या वाशीम जिल्ह्यात सध्या सव्वादोन लाख क्विंटलपेक्षा अधिक तूर गोदामात साठविलेली अाहे. या जिल्ह्यात पाच लाख क्विंटल खरेदीपैकी अर्धी तूर उचलली गेली. अशीच परिस्थिती इतरही जिल्ह्यांमध्ये अाहे. 

अधिकारी म्हणतात चिंतेचे कारण नाही
सध्या गोदामामध्ये असलेल्या तुरीच्या मुद्यावर अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, अामची उचल प्रक्रिया निरंतर सुरू अाहे. त्यामुळे सध्या तरी गोदामात तूर साठविण्याचा प्रश्न निर्माण होईल, असे वाटत नाही. गरज पडल्यास शासना खासगी गोदाम साठविण्यासाठी घेऊ शकते, असे अधिकाऱ्याने सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
कळमणा बाजार समितीत गव्हाची आवक वाढलीनागपूर ः बाजारात गव्हाची आवक वाढली असून सरासरी...
जळगाव बाजार समितीत हिरव्या मिरचीचे दर...जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या...
जंगलातून होणाऱ्या नत्र प्रदूषणाचे...अमेरिकन वनसेवेतील शास्त्रज्ञांनी जंगलातून...
वनस्पती अवशेषापासून स्वस्त, शाश्वत हवाई...पिकांचे अवशेष आणि झाडांची लाकडे यांच्यापासून...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ७००० ते १३५००...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत अन्य भुसार...
थकीत चुकाऱ्यांसाठी स्वाभिमानी आक्रमकबुलडाणा : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी तूर, मूग, उडदाची...
सोलापूरसाठी उजनीतून पाणी सोडलेसोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोलापूर...
लासुर्णेमध्ये जिल्हा बॅंकेसमाेर...वालचंदनगर, जि. पुणे ः लासुर्णे (ता. इंदापूर)...
अकोला, बुलडाण्यात अर्ज दाखल करण्यासाठी...अकोला : लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल...
परभणी जिल्ह्यात मनरेगाअंतर्गत १४६...परभणी ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार...
नगर : अकोल्यात कांदा प्रतिक्विंटल ११००...नगर ः जिल्ह्यातील राहुरी, राहाता, अकोले पारनेर...
जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये रंगणार...जळगाव ः खानदेशात रावेर वगळता नंदुरबार, धुळे व...
गरिबांना वार्षिक ७२ हजारांच्या हमीचे...नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने...
नांदेड जिल्ह्यात तूर उत्पादकता...नांदेड  ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ मधील खरीप...
कानिफनाथ महाराज समाधी दर्शनासाठी...मढी, जि. नगर  : भटक्यांची पंढरी अशी ओळख...
सोशल मीडियावर चढला निवडणुकांचा ज्वरनागपूर ः सोशल मीडियावरच पक्ष पदाधिकारी,...
हवाई दलात चार ‘चिनुक' हेलिकॉप्टर सामीलचंडीगड ः ‘चिनुक' हेलिकॉप्टरमुळे परिस्थितीत...
नाट्यमय घडामोडीत काॅँग्रेसने चंद्रपूरचा...चंद्रपूर  ः विनायक बांगडे यांच्या उमेदवारीला...
सातारा जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम...सातारा ः जिल्ह्यातील साखर गाळप हंगाम अंतिम...
पाणी अमूल्य असल्याने जनजागृतेची गरज ः...कोल्हापूर : ‘‘पाण्यासाठी व्यापक जनजागृती होणे...