लौटकर आऊँगा...! अटलजींना साश्रू नयनांनी निरोप

लौटकर आऊँगा...! अटलजींना साश्रू नयनांनी निरोप
लौटकर आऊँगा...! अटलजींना साश्रू नयनांनी निरोप

नवी दिल्ली : प्रखर देशभक्त, भारतरत्न, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या रुपाने एक युग आज अनंतात विलिन झाले. स्मृतीस्थळ येथे अटलजींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यावेळी अनेकांना हुंदका आवरला नाही. 'अटलजी अमर रहे'च्या घोषणांनी स्मृतीस्थळही काही काळ गहिवरला.  जाज्वल्य राष्ट्रवादी विचारांना आपल्या ओघावत्या शैलीने सर्वांच्या मनात घर करणाऱ्या या युगपुरुषाला अंतिम निरोप देतांना अश्रू अनावर झाले. 

शासकीय इतमामात वाजपेयी यांच्या पार्थिवावर आज (ता.१७) अंत्यसंस्कार करणात आले. यावेळी वाजपेयी यांच्या मानस कन्या नमिता भट्टाचार्य यांनी मुखाग्नी दिला. याप्रसंगी वाजपेयी यांचे कुटुंबिये, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांच्यासह विविध केंद्रीय मंत्री, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंगभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, कॉंग्रेस नेत्या  सोनिया गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आदी मान्यवरांसह विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.   

तत्पुर्वी, अटलजींचे निवासस्थान, भाजप मुख्यालयात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. देशभरातून आलेल्या असंख्य लोकांनी आपल्या लाडक्या नेत्यास श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर स्मृतीस्थळाकडे निघालेल्या अंत्ययात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्रीमंडळ सदस्य, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले. 

वाजपेयींच्या अंत्ययात्रेत मोदी चालले पायी... देशाचा पंतप्रधान एका माजी पंतप्रधानांच्या अंत्ययात्रेत पूर्णवेळ सहभागी झाल्याची घटना प्रथमच अनुभवास आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या अंत्ययात्रेत भाजप मुख्यालयापासून ते अंत्यसंस्काराच्या राष्ट्रीय स्मृती स्थळापर्यंत मोदी सहभागी झाले. हे अंतर सहा किलोमीटर होते. मोदी यांनी आपली गुरूभक्ती या निमित्ताने दाखवली. वाजपेयी हे एम्समध्ये रुग्णालयात असताना मोदी हे दोन-तीन वेळा त्यांची भेट घेण्यास गेले. अंत्यसंस्काराच्या नियोजनात त्यांनी लक्ष घातले. वाजपेयी यांच्याबद्दलच्या आपल्या भावना त्यांनी उत्कट शब्दांत व्यक्त केल्या होत्या. अतिशय धीरगंभीर चेहऱ्याने मोदी हे गेले दोन दिवस वावरत होते.

वाजपेयी यांचे गुरुवारी (ता. १६) सायंकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.  अटलजी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना गेले नऊ आठवडे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी संध्याकाळी ५.०५ मिनिटांनी त्यांचे निधन झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com